देहू ते देहूरोड मार्ग शनिवारी बंद राहणार
esakal April 17, 2025 01:45 AM

देहू, ता.१६ : देहू ते देहूरोड दरम्यान सीओडी डेपोजवळ असलेल्या रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे देहूतील परंडवाल चौक ते देहूरोड या मार्गावर वाहतूक शनिवार (ता.१९) दुपारी १ ते २० एप्रिलपर्यंत संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान बंद राहणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे कळविण्यात आले आहे. हा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नमूद कालावधीत वाहनधारकांनी देहू ते तळवडे मार्गे निगडी, देहूरोडकडे यावे, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.