आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 32 वा सामना हा बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरनंतर स्पष्ट होणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. दिल्ली कॅपिट्ल्सने अरुण जेटली स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांनी चिवटपणे या धावांचा बचाव केला आणि सामना बरोबरीत रोखण्यात यश मिळवलं. त्यामुळे आता सुपर ओव्हरनंतर कोणता संघ यशस्वी ठरतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. अशाप्रकारे हा या मोसमातील टाय झालेला पहिलावहिला सामना ठरला.