Maharashtra News Live Updates: छत्रपती संभाजीनगर : महावितरण कार्यालयात हातात कोयता घेऊन एका तरुणाचा धुडगूस
Saam TV April 17, 2025 02:45 PM
नाशिकच्या काठे गल्लीत सऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता

नाशिकच्या काठे गल्ली सिग्नल परिसरातील अनाधिकृत बांधकामाच्या वादावरून सलग दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता आहे. दुसऱ्या दिवशीही संपूर्ण परिसर सील आहे. पोलिसांचा २४ तास बंदोबस्त तैनात आहे. संपूर्ण अनाधिकृत बांधकाम हटवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती देण्यात आली.

Maharashtra News Live Updates: छत्रपती संभाजीनगर : महावितरण कार्यालयात हातात कोयता घेऊन एका तरुणाचा धुडगूस

महावितरण कार्यालयात हातात कोयता घेऊन एका तरुणाचा धुडगूस, कोयत्याने तोडफोड केली. नवीन मीटर मिळत नसल्याने तरुणाची महावितरण कार्यालयात गुंडगिरी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. जीन्सी पोलीस ठाण्यामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपी तरुणावर गुन्हा दाखल.

छत्रपती संभाजीनगरच्या अहिंसानगर महावितरण कार्यालयातील प्रकार

कैसर शेख असं गुंडगिरी करणाऱ्या तरुणाच नाव

महावितरण कार्यात धुडघूस घालणारा तरुण सीसीटीव्ही कैद

महावितरण कार्यातील खुर्च्या आणि साहित्यांची कोयत्याने केली तोडफोड

Maharashtra News Live Updates: संतोष देशमुख हत्या प्रकरण; एसआयटी पथकात नवे दोन कर्मचारी वाढवले, तपासाला गती

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकात पथकात दोन नवे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. केज पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय या ठिकाणाचे हे कर्मचारी आहेत. याबाबतचे आदेश बुधवारी गृह विभागाने जारी केले.

Sangli : आयुक्त सत्यम गांधी यांनी कार्यभार स्वीकारला

सांगली महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून सत्यम गांधी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. सत्यम गांधी यांनी पहिल्याच दिवशी सांगलीत येत महापालिकेत आपल्या कामकाजाला सुरुवात केली. नागरिकांनी कोणत्याही तक्रारीबाबत कार्यालयात येऊन थेट संपर्क साधावा असा आवाहन त्यांनी केलंय. सहकारी कर्मचाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार त्यांना कामाच्या प्राथमिकता स्पष्ट केल्या असून त्यानुसार सर्व कार्यालयांमधील स्वच्छता, नागरिकांच्या तक्रारींची वेळीस दखल आणि निराकरण तसेच कार्यालयीन कारभारात पारदर्शकता आणावी असे संकेतही त्यांनी दिले.

Maharashtra News Live Updates: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील व्हीआयपी दर्शन तिकिटांच्या काळाबाजाराचा प्रकार उघडकीस

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील व्हीआयपी दर्शन तिकिटांच्या काळाबाजाराचा प्रकार उघडकीस आला आहे. ६०० रुपयांचे देणगी दर्शन पास तब्बल दोन हजार रुपयांना विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. २२ मार्चला निदर्शनास आला देणगी दर्शन पासच्या काळाबाजाराचा प्रकार होता.

Satara : जिल्ह्यात 90 हजार महिला लखपती दीदी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यात महिला बचत गटांची चळवळ वेगाने वाढत आहे. बचत गटांना विविध व्यवसायासाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज पुरवठाही करण्यात येत असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२५ वर्षात 233 कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. यामुळे महिला स्वावलंबी होत असून विविध उत्पादने घेऊन त्याची विक्री ही करत आहेत. जिल्ह्यात सध्या 90 हजारांवर महिला लखपती दिली झाल्या आहेत.

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील अनाधिकृत बांधकामावरील महापालिकेच्या कारवाईला स्थगिती

- काठे गल्ली सिग्नल परिसरातील अनाधिकृत बांधकामावरील महापालिकेच्या कारवाईला स्थगिती

- सर्वोच्च न्यायालयाने दिली महापालिकेच्या कारवाईला स्थगिती

- महापालिकेने बजावलेल्या अतिक्रमण नोटीसला ट्रस्टने दिलं होतं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

- महापालिकेच्या नोटीस विरोधात उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली नसल्याचा ट्रस्टकडून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

- महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन राबवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पार पडली सुनावणी

- या पुढील कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश

- उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी का केली नाही? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने विचारला खुलासा

- 21 एप्रिलला होणार पुढील सुनावणी, सुनावणीत महापालिका काय बाजू मांडणार? याकडे लक्ष

Pune News Live Updates: पुण्यातील धरणाच्या पाणी साठ्यात घट

वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली असून, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून १०.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे . शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जलसंपदा विभागाने पालिकेला काटकसरीने पाणी वापरण्याच आवाहन केल आहे

वाशिम तालुक्यात 84 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

वाशिम तालुक्यातील 84 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आज आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. तहसील कार्यालयातील सभागृहात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. या प्रक्रियेत 21 पदे सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी, 21 पदे सर्वसाधारण महिलांसाठी, 10 अनुसूचित जाती पुरुष, 10 अनुसूचित जाती महिला, 9 नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) पुरुष, 10 OBC महिला, 1 अनुसूचित जमाती पुरुष आणि 2 अनुसूचित जमाती महिलांसाठी अशी आरक्षण यादी ठरवण्यात आली. सोडतीदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी सर्व चिठ्ठया लहान मुलांच्या हस्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत उघडण्यात आल्या.

उल्हास नरड यांच्याकडून सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल

- बोगस शिक्षक भरती प्रकरणात आरोपी असलेले विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्याकडून सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल

- उल्हासनगर यांच्याकडून वकिलाने केला कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल

- बेकायदेशीर अटक, प्रक्रियात्मक त्रुटी आणि अधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी लक्ष्य करून कट रचल्याचा दावा जामीन याचिकेत केला आहे

- योग्यता नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यध्यापक पदाला मंजुरी दिल्या प्रकरणी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना पोलिसांनी अटक केली

- पाच दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर कोर्टाने उल्हासनगर आणि इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

- न्यायालयीन कोठडी सुनावताच उल्हासनगर यांच्याकडून जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे

- पुढील सूनवणीपूर्वी कोर्टाने तपास अधिकाऱ्याचा या जामीन प्रकरणी अभिप्राय मागितला आहे

Nagpur : मोहम्मद हमीद इंजिनिअरच्या जामीन प्रकरणात कोर्टाने सरकारला फटकारले

मोहम्मद हमीद इंजिनिअर याच्या जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी राज्य सरकारमुळे वारंवार पुढे ढकलावी लागत आहे त्यामुळे सत्र न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला फटकारले. मोहम्मद हमीद इंजिनियर हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष आहे.

17 मार्चला नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद हमीद इंजिनिअरला विविध गुन्ह्याखाली अटक केली आहे. हमीद इंजिनिअरने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र राज्य सरकारने यापूर्वी विविध कारणास्तव तीन वेळा तारीख वाढवून मागितली होती.

बुधवारी तपास अधिकारी न्यायालयात हजर राहू शकले नाही ज्यामुळे पुन्हा तारीख मागण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त करत अंतिम संधी म्हणून अर्जावर येत्या 21 एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.

राज्यातील शालेय स्तरावरील समित्यांची संख्या कमी करण्यात आली

शाळांमध्ये आता शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती या चार समित्या राहणार आहेत.

शाळास्तरावरील १२ समित्यांचे शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे.

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’नुसार, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार

अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत.

जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अमलबजावणी करण्यात येणार आहे.

Pune : सायबर चोरट्यांचा डोळा आता पालिकेच्या पाणी पुरवठ्यावर

लॉटरी, बक्षीस लागल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या सायबर चोरांनी आता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा आधार घेऊन फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

पाणीपट्टी थकबाकी भरा, अन्यथा रात्री नळजोड तोडण्यात येईल, असे मेसेज आणि लिंक पाठवत नागरिकांना तातडीने थकबाकी भरण्यास सांगून फसवणूक केली जात आहे.

अशा पद्धतीने फसवणूक झाल्याच्या काही तक्रारी महापालिकेकडे आल्यात

त्यांनतर सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे

अकोल्यात उन्हापासून संरक्षण मिळावं, यासाठी शेतकऱ्यांकडून केळी रोपांना क्रॉप कव्हर'चा वापर...

अकोल्यात उन्हाचा पारा आता 43 अंशावर गेलाय.. या उन्हाच्या तिव्रतेमूळ नव्याने लागवड केलेल्या केळी पिकांच्या रोपांची अवस्था नाजूक होऊ लागली.. त्यामुळ अकोल्यातल्या तेल्हारा तालूक्याला शेतकरी आता केळी रोपांना वाचविण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करताना दिसू लागलेये. तेल्हारा तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागात मार्चअखेर केळीच्या रोपांची लागवड केली गेलीये. विशेष म्हणजे हे केळीचे पीक अगदी नाजूक असल्याने उन्हापासून संरक्षण करणं अवघडच राहत. म्हणून आता पिक वाचविण्यासाठी शेतकरी रोपांच्या तीन किंवा चारही बाजूला काड्या लावून कागदाचा वापर करून रोपाला संरक्षण देताहेत..

अंबरनाथमधील अनधिकृत मदरसा अखेर जमीनदोस्त!

अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरच पालिका शाळा क्रमांक १ च्या आवारात हा अनधिकृत मदरसा उभारण्यात आला होता. यानंतर अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र संख्ये यांनी अतिशय गोपनीय पद्धतीने कोणताही पोलीस बंदोबस्त न घेता या मदरशावर तोडक कारवाई केली आणि जेसीबीच्या साहाय्याने हा मदरसा जमीनदोस्त केला. या कारवाईनंतर शहरातील इतर शासकीय जागेतील अतिक्रमणांवरही कारवाई होते का? हे पाहावं लागणार आहे

पंढरपुरात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते विधीज्ञ अॅड. संदिप कागदे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पंढरपुरातील विश्वभूषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रायगडमध्ये अल्पवयीन मुली असुरक्षित

रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. चार दिवसात अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याच्या तीन घटना रायगडमधुन समोर आल्या आहेत. बुधवारी रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात घरा शेजारी खेळत असलेल्या 10 वर्षीय मुलीला बांधकाम सुरु असलेल्या घरात बोलावून आरोपी गणेश रसाळ वय वर्ष 33 राहणार तळा याने अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे केल्याची घटना घडली. तर त्याच दरम्यान कर्जतमध्ये शाळेच्या बसमध्ये बस चालक करण पाटील याने दोन शाळकरी मुलींसोबत अश्लिल चाळे केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तळा पोलीस ठाण्यात आरोपी गणेश रसाळ आणि कर्जत पोलिस ठाण्यात बस चालक आरोपी करण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 14 एप्रिल रोजी महाड शहरात शिकवणीवरून घरी परत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर सोसायटीच्या ऑफिसमध्ये लैंगिक चाळे केल्याची घटना पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. अल्पवयीन शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या सलग घडणाऱ्या या घटनांमुळे रायगडमध्ये शाळकरी सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उघड विरोधक चांगला पण आज घरातील छुपे विरोधक समजले - जयंत पाटील

उघड विरोधक चांगला पण घरातील छुपा विरोधक बरोबर नसतो आज आमच्यात राहून आमच्या विरोधात कोण होतं हे आम्हाला समजलं ही चांगली गोष्ट असल्याचं समजलं असं शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी म्हटलंय. जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील आणि भाचे आस्वाद पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनतर जयंत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.या मेळाव्याला अलिबाग तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभा निवडणूकीत या लोकांनी आमच्या विरोधात काम केलं हे आज स्पष्ट झालंय असं जयंत पाटील म्हणाले. यापूर्वी असे अनेक धक्के पक्षाने सहन केलेत ज्यांना मोठं केलं ते खोटे निघाले. पक्ष सोडून गेले परंतु नवीन नेते तयार करण्याची ताकद पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जत-जामखेड दौरा

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच आमदार रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात येत आहेत. तर अजित पवारांच्या स्वागताचे रोहित पवार यांच्या नावाने बॅनर लागले आहेत. कर्जत जामखेडच्या पावन भूमीत सहर्ष स्वागत, स्वागतोत्सुक आमदार रोहित दादा पवार मित्रपरिवार आणि समस्त कर्जत जामखेडकर अशा अश्याचा झळकला बॅनर

जामखेड शहरात पोलीस स्टेशन रोड वर लावण्यात आला बॅनर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.