JEE Mains 2025 Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)चा जेईई मेन्स सेशन-2 चा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी हे अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांचा निकाल चेक करू शकतात. आपला निकाल काय लागला हे तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून लॉग इन करावे लागेल. जेईई मेन 2025 पेपर 1 (बीई/बीटेक) साठी बसलेले उमेदवार हे त्यांचा निकाल आणि अंतिम उत्तरपत्रिका अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर तपासू शकतात.
कधी झाली परीक्षा ?
JEE Main 2025 सेशन 2 ची परीक्षा ही 2, 3,4 आणि 7 एप्रिल रोजी 2 शिफ्ट्समध्ये झाली होती. पहिली शिफ्ट ही सकाळी 9 ते 12 तर दुसरी शिफ्ट ही दुपारी 3 ते 6 पर्यंत झाली होती. तर 8 एप्रिल रोजी फक्त एकाच शिफ्टमध्ये परीक्षा झाली, त्याची वेळ दुपारी 3 ते 6 अशी होती.
पेपर 2A (B.Arch) आणि पेपर पेपर 2B (B.Planning) ची परीक्षा एकाच दिवशी सकाळी 9 ते दुपारी 12:30 या वेळेत एकाच शिफ्टमध्ये घेण्यात आली. जेईई मेन 2025 च्या सत्र2 च्या पेपर 1 साठीची प्रोव्हिजनल आन्सर की 11 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या उत्तरपत्रिकेवर आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2025 होती.
कट ऑफसह जाहीर होणार AIR
निकाल घोषित झाल्यावर NTA टॉपर्सच्या यादीसह कॅटॅगरीनुसार कट-ऑफ आणि अखिल भारतीय रँकही (AIR ) जाहीर होणार आहे. जेईई मेन पर्सेंटाइल स्कोअर हे सामान्यीकरण प्रक्रियेचा (Calculation normalization process) वापर करून मोजला जातो.
असा चेक करा रिझल्ट
सर्वप्रथम jeemain.nta.ac.in या NTA JEE च्या अधिकृत वेबसाइट वर जा.
येथे तुम्हाला होम पेजवर JEE मेन्स निकाल 2025 ची लिंक दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
ते डाउनलोड करून ठेवा, भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकतो