आयपीएलच्या 18 व्या मोसमात आज शनिवारी 19 एप्रिलला डबल हेडर अर्थात 2 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. हा सामना राजस्थानच्या होम ग्राउंड असलेल्या सवाई मानसिंह स्टेडियम जयपूर येथे करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजचा टॉस झाला. लखनौच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार ऋषभ पंत याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यातून राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन बाहेर झाला आहे. संजूला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे संजूच्या अनुपस्थितीत युवा रियान पराग याच्याकडे कर्णधारपदाची धुरा आहे. तसेच राजस्थानने या सामन्यातून वैभव सूर्यवंशी याला आयपीएल पदार्पण करण्याची संधी दिली आहे. वैभवचं 14 व्या वर्षी पदार्पण झालं आहे. वैभव यासह आयपीएल इतिहासातील सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू ठरला आहे. वैभवचा इमपॅक्ट प्लेअरमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वैभव दुसऱ्या डावात बॅटिंगसाठी येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनौने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. प्रिंस यादव याच्या जागी आकाश दीप याचं कमबॅक झालं आहे.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर, प्रिन्स यादव, दिग्वेश सिंग राठी आणि आवेश खान.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, रियान पराग (कर्णधार), नितीश राणा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.