काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यावरील ईडी कारवाई चा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून देशभरात आंदोलन करण्यात येत आहेत.आज मुंबई युथ काँग्रेस अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत युथ काँग्रेस कडून ईडी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी ईडी कार्यालयाला टाळे ठोकले.
Beed Live: बाबासाहेब आगे हत्या प्रकरणी आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीबीडमधील माजलगावच्या भाजपा लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांची भाजपाच्या कार्यालयासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी नारायण फपाळ याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याचा निर्णय माजलगाव न्यायालयाकडून देण्यात आला.
Mumbai Live: भांडूपमध्ये तलवार घेऊन रस्त्यावर फिरत तरुणाचा हैदोसभांडुपमध्ये एका तरुणाने तलवार घेऊन रस्त्यावर फिरत हैदोस माजवला. त्याने बेस्ट बस अडवून बस आणि रिक्षाची तोडफोड केली आहे. तसेच रस्त्यावरील नागरिकांनाही तलवार दाखवू लागला. पण आता त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा साई दरबारीआम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा साई दरबारी पोहोचले आहेत. शिर्डी विमानतळाचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे खासदार चढ्ढा यांनी सांगितले.
राज ठाकरेंकडून काही रिप्लाय आला तर तो नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही - संजय राऊतराज ठाकरेंकडून काही रिप्लाय आला तर तो नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही.
Pune Live: पुणे शहराला काळीमा लावणारी घटना, शाळेच्या बस चालकाकडून मुलींवर दुर्दैवी प्रकार- पुणे शहरातील एका शाळेत अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.
- शाळेच्या व्हॅन चालकाने चार विद्यार्थिनींवर अश्लील वर्तन केले असून, त्यांना घरी सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
- या प्रकारामुळे मुली प्रचंड घाबरल्या.
- ही घटना समजताच परिसरातील नागरिक आणि मुलींचे नातेवाईक नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.
- पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी व्हॅन चालकाला ताब्यात घेतले.
- दरम्यान, आरोपीला पतीत पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप देण्यात आला.
- सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Solapur Live: बाळे परिसरातील रस्त्याची चाळण; नागरिकांचे आंदोलनाचे इशारेहद्दवाढ भाग बाळे परिसरातील खडक गल्ली तालीम ते तोडकरी वस्ती येथील अंबिका माता मंदिर रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरक्ष: चाळण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.
त्यामुळे नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय अनेक दुचाकीधारकांचे अपघात झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
संतोष नगर ते ढेपे प्रशाला मार्गावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. नागरिकांनी स्थानिक माजी लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही अद्याप हा रस्ता तयार करण्याकडे महापालिका प्रशासनाने डोळेझाक केली आहे.
त्यामुळे बाळेकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. लवकरात लवकर हा रस्ता नव्याने तयार करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Solapur Live: तोडलेल्या फांद्या अद्यापही पदपथावरच; पादचाऱ्यांची गैरसोय कायमशहरातील रेल्वे स्टेशन येथील पदपथावर गेल्या अनेक दिवसांपासून झाडांच्या तोडलेल्या फांद्या पडून आहेत.
त्यामुळे पादचारी नागरिकांना रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिका किंवा रेल्वे प्रशासनानेच अनावश्यक वाढलेल्या फांद्या तोडलेल्या असण्याची शक्यता आहे.
Satara Live: साताऱ्यात ४५ गावे, २९८ वाड्यांना ५५ टँकरने पाणीपुरवठासातारा जिल्ह्यातील ४५ गावे व २९८ वाड्या तहानलेल्या आहेत. ६९ हजार ८७२ नागरिक व ४२ हजार ७४७ जनावरांना ५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एप्रिल महिन्यातच इतक्या टँकरने पाणी दिले जात असताना मे महिन्यात भीषणता आणखी वाढणार आहे.सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस तीव्र उन्हाळा जाणवू लागल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Jalna Live: जालन्यातील अतिवृष्टी अनुदान वितरणात गैरप्रकारअतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबद्दल जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या अनुदानात ५० कोटी रुपयांचा गैरप्रकार झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे. २०२३-२०२४ आणि २०२४-२०२५ या दोन वर्षांची ही प्राथमिक चौकशी आहे.
Chandrapur Live: चंद्रपुरात जोरदार पावसाची हजेरीचंद्रपूरमध्ये अचानक पावसाची हजेरी
जिल्ह्यात जोरदार पाऊस
हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा
मात्र दुसरीकडे अवकाळीचा शेतकऱ्यांना मोठा फटका
मुंबईवर पाणीबाणीचे मोठं संकट ओढावले आहे. पुढील २४ तास मुंबईतील काही भागात पाणी पुरवठा होणार नाही. मेट्रोचे काम सुरू असताना अमर महल जंक्शन येथील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्तीसाठी जलवाहिनी २४ तास बंद करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मुंबईतील एम पूर्व, एम पश्चिम,एन, एल,एफ उत्तर विभागातील काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर एफ दक्षिण विभागातील काही भागात पाणीपुरवठा अंशत: बंद आहे.
Live : नांदेडचे पालकमंत्र्यांविरोधात शिवसेना अन् भाजप आमदारांची तक्रारतांडा वस्तीचा निधी विरोधकांना वाटप केल्याचा आरोप हदगावचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केला आहे. आमदार कदम यांनी थेट अतुल सावेना पत्र लिहून नांदेड दौऱ्यावर आल्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांसह निषेध व्यक्त करण्याचा दिला इशारा. अनेक पत्र व्यवहार करूनही विरोधकांना निधी दिल्याचा मंत्री अतुल सावे यांच्यावर आमदार बाबुराव कदम यांचा आरोप तर भाजपाचे मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी थेट देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहून अतुल सावे यांची तक्रार केली आहे.
Live : रायगडमध्ये समुद्रात बुडून तिघांचा मृत्यू, श्रीवर्धन येथील घटना, बचावकार्य सुरुश्रीवर्धन येथील वेळास समुद्रात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन भावांचा समावेश होता. परिसरात बचावकार्य सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच वेळा समुद्र किनारी एकच गर्दी जमली.
Live : हिंदी सक्तीविरोधात मनसेचं घाटकोपरमध्ये आंदोलन, लेझीम पथक अन् वारकरी वेशात कार्यकर्ते रस्त्यावरहिंदी सक्ती विरोधात घाटकोपरच्या असल्फा मेट्रो स्टेशन जवळ मनसे कार्यकर्त्यांकडून मराठमोळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं लेझीम पथक तसेच वारकरी वेश परिधान करत या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी मनसे च्या कार्यकर्त्यांकडून हिंदी सक्तीचा जीआर फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
CM Devendra Fadnavis live Updates: नाशिकमधील दंगल ठरवून घडवली गेली – फडणवीसांचा आरोप नाशिकमधील दंगल ठरवून घडवली गेली – फडणवीसांचा आरोपनाशिकमध्ये अलीकडे घडलेली दंगल ही कोणतीही नैसर्गिक घटना नव्हती, तर ती मुद्दाम घडवण्यात आली होती, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
नाशिकमध्ये अतिक्रमण हटवण्याची कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली होती. या कारवाईला अनेक स्थानिक नागरिकांनी पाठिंबाही दिला होता. मात्र, काही लोकांनी जाणीवपूर्वक विरोध करत वातावरण तापवले आणि अखेर दंगल उफाळून आली, असा दावा फडणवीस यांनी केला.
“दंगल घडवण्यासाठी ही एक पूर्वनियोजित योजना होती,” असं सांगताना त्यांनी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने संयम पाळत काम केल्याचेही नमूद केलं.
याप्रकरणात दोषींना वाचण्याची कोणतीही संधी दिली जाणार नाही आणि कायद्याच्या चौकटीत राहून कठोर पावले उचलली जातील, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
Supriya Sule live Updates: मराठी भाषा ही पहिली भाषा असली पाहिजे, मला वाटते एसएससी बोर्ड संपवण्याचे षड्यंत्र आहे - खासदार सुप्रिया सुळेशाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून समावेश करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एससीपी) खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी आधीही सांगितले आहे की हा निर्णय घाईघाईने घेण्यात आला आहे. मराठी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि तो पहिल्या क्रमांकावर राहील. शिक्षण क्षेत्रात खूप काम करायचे आहे आणि मराठी भाषा ही पहिली भाषा असली पाहिजे. मला वाटते की हे पाऊल आपले एसएससी बोर्ड संपवण्याचे षड्यंत्र आहे."
CM Devendra Fadnavis live Updates: जर कोणी मराठीला विरोध केला तर ते सहन केले जाणार नाही -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशाळांमध्ये हिंदीचा तिसरा भाषा म्हणून समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे, प्रत्येकाने ती शिकली पाहिजे. यासोबतच, जर तुम्हाला इतर भाषा शिकायच्या असतील तर तुम्ही त्या देखील शिकू शकता. हिंदीला विरोध करणे आणि इंग्रजीचा प्रचार करणे आश्चर्यकारक आहे. जर कोणी मराठीला विरोध केला तर ते सहन केले जाणार नाही."
Ashish Shelar live Updates: आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ झाली - माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारआधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून पूर्वी एका आधार नोंदणीसाठी २० रुपये देण्यात येत होते आता ५० रुपये मिळणार - माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार.
मध्य रल्वेवरील कसारा ते कल्याणदरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यानं हा खोळंबा झाला आहे.
Nashik Live: काठे गल्ली सिग्नल परिसर रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुलानाशिकच्या काठे गल्ली सिग्नल परिसरातील रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. ४ दिवसानंतर पोलीसांनी रस्त्यावरील बॅरीकेट्स हटवले आहेत. काठे गल्ली सिग्नल परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र, अनाधिकृत बांधकामावरील कारवाईनंतर शहरात शांतता असल्यानं पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. दरम्यान पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला असला तरी देखील अनधिकृत बांधकाम परिसरात पोलिसांचा बंदोबस्त मात्र कायम आहे.
Mumbai Live: महापालिकेच्या के पूर्व बृहन्मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभारजोगेश्वरी पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 73 मध्ये महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील मनपा शाळेसमोरील गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये एक पादचारी अडकला. गेल्या अनेक महिन्यांपासून हे चेंबर तुटलेल्या स्थितीत असून, पालिकेने कोणतीही दखल घेतली नव्हती. अखेर स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत वेल्डिंगच्या सहाय्याने चेंबरवरील जाळी कापून त्या पादचाऱ्याची सुटका केली. ही घटना मनपाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण ठरली असून, परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Nashik Live: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळावर मोठा विकास२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. सध्या केवळ ५ मिनी एअरक्राफ्ट थांबू शकणाऱ्या या विमानतळावर लवकरच १५ विमाने थांबवण्याची क्षमता निर्माण केली जाणार आहे. प्रवासी व्यवस्थापनासाठी नव्या टर्मिनल इमारतीचे बांधकाम एचएएलच्या माध्यमातून ९६८ कोटी रुपयांत होत असून, त्यातून तासाला प्रवासी क्षमता ३०० वरून थेट १५०० पर्यंत वाढवण्यात येणार आहे. याशिवाय, सुमारे २०० कोटी रुपये खर्चून आशिया खंडातील सर्वात मोठी समांतर धावपट्टीही उभारण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकल्पामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात देशविदेशातील लाखो भाविकांना अधिक सुलभ आणि जलद सेवा मिळणार असून, नाशिकचे महत्त्वही वाढणार आहे.
Nagpur Live: नागपूरला नव्या १५० ई-बसची मिळकत; कोराडी आणि खापरी डेपोवरून होणार संचालननागपूर महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या पंतप्रधान ई-बस सेवा योजनेअंतर्गत १५० नवीन ई-बसेस मिळणार असून, यातील ७५ बसेस कोराडी येथील बस डेपोमधून आणि उर्वरित ७५ खापरी डेपोमधून चालवल्या जाणार आहेत. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोराडीतील प्रस्तावित ई-बस डेपोची पाहणी केली असून, मीटर रुम, ट्रान्सफर रुम आणि चार्जिंग स्टेशन यांचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ही योजना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत राबविली जात असून, नागपूर शहरात शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
Sangram Thopte : भोर विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर, कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरूभोर विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजप वाटेवर आहेत. भोर मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत ते संवाद साधत आहेत. आज मुळशी तालुक्यातील काही गावात बैठका घेणार आहेत, तर उद्या भोर तालुक्यात मेळावा घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान, संग्राम थोपटे उद्या संध्याकाळी काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊ शकतात आणि 21 किंवा 22 एप्रिलला भाजप प्रवेश करु शकतात.
Magadh University LIVE : मगध विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंवर 'ईडी'चे आरोपपत्रनवी दिल्ली : बिहारमधील मगध विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंसह त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेकायदा संपत्ती बाळगल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र सादर केले आहे. या प्रकरणात डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह त्यांचा मुलगा डॉ. अशोक कुमार, भाऊ अवधेश प्रसाद यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. येथील ‘प्यारी देवी मेमोरिअल वेल्फेअर ट्रस्ट’चाही या हेराफेरीशी संबंध असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Kolhapur News : संविधानाच्या सन्मानासाठी कोल्हापुरात उद्या मिरवणूककोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित क्रांतिसूर्य जोतिराव फुले, डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त रविवारी (ता. २०) संविधानाच्या सन्मानार्थ विविध चित्ररथांसहित मिरवणूक निघणार आहे. दुपारी चार वाजता बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महापालिका, सीपीआर चौक, दसरा चौकमार्गे पुन्हा बिंदू चौकात मिरवणूक येईल. तिथेच सायंकाळी सहा वाजता चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. सुकुमार कांबळे यांची सभा होईल. समाजकल्याण सहायक आयुक्त सचिन साळे प्रमुख उपस्थित असतील. जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य अध्यक्षस्थानी असतील. सभेस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बाजीराव नाईक, अविनाश शिंदे, आर. एस. दीक्षांत, सुकुमार कोठावळे, उषा गवंडी आदींनी केले आहे.
JEE Main Result 2025 : परिक्षार्थींना मोठा दिलासा! सत्र 2 चा निकाल जाहीरJEE Main 2025 सत्र 2 चा निकाल राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने अधिकृतपणे जाहीर केला आहे. JEE अर्थात जॉइंट एंट्रन्स एग्झामिनेशन मध्ये सहभागी झालेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. उमेदवारांना आपले गुण आणि स्कोअरकार्ड पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट वर भेट द्यावी लागेल.
Mustafabad Building Collapses : दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये कोसळली इमारत, चार जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीतीदिल्ली : दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज पहाटे मुस्तफाबाद परिसरात एक इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. श्वान पथके, एनडीआरएफ आणि दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे.
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आज (शनिवार) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत कोरेगाव, सातारा व कऱ्हाड तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यास अजितदादा उपस्थित राहतील. रात्री साडेआठ वाजता ते कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत.
Ajara Sugar Factory : आजरा कारखाना अध्यक्षपद निवडीसाठी आज कोल्हापुरात मुलाखतीआजरा : आजरा साखर कारखाना अध्यक्षपद निवड मंगळवारी (ता. २२) होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ संचालकांच्या मुलाखती शनिवारी (ता. १९) घेणार आहेत. यामध्ये मंत्री मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Beed Crime LIVE : वकील महिलेस मारहाण; सरपंचासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखलकेज (जि. बीड) : ध्वनी प्रदूषणामुळे त्रास होत असल्याने आवाज कमी करण्यासंदर्भात तक्रार केल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील सनगावचे सरपंच अनंत रघुनाथ अंजान याच्यासह दहा जणांनी गावातील वकील महिलेस काठ्या, रबरी पाईपने बेदम मारहाण केली. ही घटना चौदा एप्रिलला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात त्याच दिवशी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. मारहाणीसंदर्भातील छायाचित्रे गुरुवारी (ता. १७) समाज माध्यमांवर समोर आल्यानंतर सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध केला.
Ranjit Kasale LIVE : फौजदार रणजित कासले अखेर बडतर्फ; ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कोठडीLatest Marathi Live Updates 19 April 2025 : सोलापूर येथील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:च्या घरी बाथरूममध्ये डोक्यात दोन गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १८) सोलापूर शहरातील मोदी परिसरात घडली आहे. तसेच निलंबित आणि वादग्रस्त पोलिस अधिकारी रणजीत कासले याला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी बडतर्फीची कारवाई केली असून ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात त्याला पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी अटक देखील केली. ध्वनी प्रदूषणामुळे त्रास होत असल्याने आवाज कमी करण्यासंदर्भात तक्रार केल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील सनगावचे सरपंच अनंत रघुनाथ अंजान याच्यासह दहा जणांनी गावातील वकील महिलेस काठ्या, रबरी पाईपने बेदम मारहाण केली. ही घटना चौदा एप्रिलला सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात त्याच दिवशी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल सायन्सेसतर्फे ‘नीट पीजी २०२५’ ही वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा १५ जून रोजी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..