मला अनेक रोग, औषधाचा खर्च 10 हजार, माझ्या घरी चोरी करू नको; चक्क वकिलाचं चोरट्याला नम्र निवेदन
Marathi April 17, 2025 05:25 PM

जालना : शहरातील एका वकिलाने (lawyer) आपल्या घरात सतत होणाऱ्या चोरीला वैतागून चक्क चोरांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. ललित हट्टेकर असे पीडित वकिलाचे नाव असून शहरातला एसटी कॉलनीत राहणाऱ्या हट्टेकर यांच्या घरी तबल चार वेळा चोरी झालीय. या प्रकारामुळे आणि पोलिसांच्या (Police) दुर्लक्षामुळे त्यांनी थेट चोरालालाच निवेदन केलं असून ते बॅनरच्या स्वरूपात घरावर अडकवलय. या पत्रात त्यांनी जीवावर उदार होऊन जोखीम घेतलेल्या चोरकलेला वंदनही केलं आहे. याचबरोबर आपल्याकडे सोने-चांदी आणि पैसा नसल्याने तुमचा आणि माझा वेळ वाया घालऊ नका अशी विनंती देखील केलीय. त्यामुळे, वकिल महोदयांचं हे निवेदन सध्या जालना (Jalana) जिल्ह्यातील पोलीस व न्यायपालिका वर्तुळात चांगलच चर्चेत आलं आहे.

वकिल ललित हट्टेकर यांनी चोरट्याल नम्र निवेदन केलं असून मी आपली जोखीम, तंत्रज्ञान, समन्वय, जीवावर ऊदार होऊन चोरी करण्याच्या कलेला वंदन करतो खुप अवघड काम आहे हे, असे म्हणत यापुढे माझ्या घरी चोरी करण्याचे कष्ट घेऊ नका, असे आवाहन देखील केले आहे.

वकिलांनी चोरट्याला केलेलं निवेदन

मला तुम्हाला सांगावयाचे आहे परंतु आपली ओळख नसल्यामुळे हे निवेदन करतो की, गेल्या 6 महिन्यात तुम्ही 4 वेळा माझ्यासारख्या माणसाकडे आला. 3 वेळा तुमच्या पदरी निराशाच पडली. मात्र, एक वेळ माझ्याकडून खुपकाही घेऊन गेला. मी माझ्या आयुष्यभर ते परत कमाऊ शकत नाही. त्याचवेळी मी पोलिस स्टेशन येथे तक्रार केली. परंतु, तुम्हाला पोलिस पकडू शकले नाही. 3 वेळा तक्रार सुद्धा केली नाही. माझी वकिली फक्त माझा व कुटुंबाचा योगक्षेम चालावा इतकीच आहे. मानानी आणि स्वाभिमानानी जगता यावे इतकेच पैसे मी कमावतो. मला सगळे रोग आहे, त्याच्या गोळ्याचा, औषधाचा खर्च जवळपास 10 हजार रु. होतो.

तुमच्यामुळे जे तुम्ही दरवाजे, कोंडे तोडता व निघून जाता त्यामुळे मला विनाकारण खर्च होतो व पत्नी, मुलगा दहशतीत जगतात. मला तुमच्यामुळे दोन दरवाजे 15 हजार रु, लोखंडी कपाट दुरुस्ती ४५०० रु, सी.सी.टी.व्ही. २७,००० रु लोखंडी ग्रील ४१० किलोचे व मजुरी असे मिळून ३५००० रु. हा खर्च झाला आहे. कॅमेरे जे काढल्यानंतर काहीच ऊपयोग होत नाही ते सुद्धा तुम्ही 2 वेळेला नेले. त्याचा ६,००० रु. खर्च झाला. त्या सर्वांची उधारी मी आज सुद्धा देत आहे, अशी करुण कहानीच वकिलाने आपल्या निवेदनात दिली आहे.

करंट लागण्याची भीती

माझे घर एका कोपऱ्यात आहे. आजुबाजुला मोठ्या मोठ्या भिंती आहेत व समोर मोकळी जागा आहे. त्यामुळे तुम्हाला चोरीसाठी एक आदर्श जागा वाटते. तुम्हाला कोणाला वाटत असेल तर मी जागा सुद्धा तुम्ही जर माझी लाळ पडेल इतकी रक्कम सांगीतली तर 1 वर्षानंतर विकू शकतो (माझे आईच्या वर्ष श्राद्ध झाल्यानंतर) इथे 6000 चौ. फुट मध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे अवैध धंदे करू शकता. कोणतीही रिस्क नाही, सेफ आहे. बघा विचार करून. अजुन एक राहिले समोरचा खंबा हा पूर्ण पाण्यात आहे. त्या रस्त्याने जाऊ नका. अर्थिग करंट लागतो. मी लाईट लावायला गेलो होतो तेव्हा मला जोरात झटका बसला होता, असे सावधानही केले आहे.

माझ्याकडे शस्त्र परवाना आहे

आता महत्वाचे माझ्याकडे शस्त्र परवाना आहे, जर तुमच्या दुर्दैवाने तुम्ही सापडला तर मी मारता मारता मरेण वा तत्वाने त्याचा उपयोग करेल व विनाकारण मला जीव हत्येचे पाप लागेल. आता माझ्याकडे सोने-चांदी-पैसे वगैरे काहीही नाही. घरात फक्त मी, बायको, मुलगा, भांडे कुंडे, कपडे, फ्रीज, वॉशिंग मशिन, टी.व्ही. गाडी तिही टी.व्ही.एस. तीला पुर्नमुल्य नाही. 2 मोबाईल आहे. तरी तुमचा वेळ व माझा संयम दोन्हीही वाया घालवू नका ही हात जोडून विनंती, अशी आर्जव वकील हट्टेकर यांनी चोरट्याला निवेदनपर डिजिटलद्वारे केली आहे.

हेही वाचा

पुण्यात व्हॉल्वो बसला भरदुपारी भीषण आग, जळून खाक; प्रवाशांनी ठोकल्या उड्या

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.