Maharashtra Live Updates : : संत भगवानबाबांच्या नारळी सप्ताहला धनंजय मुंडे अनुपस्थित राहणार
Sarkarnama April 17, 2025 07:45 PM
Nashik Satpir Dargah : ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती दिली नाही

नाशिकचा सातपीर दर्गा पाडल्यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. दर्गा ट्रस्ट किंवा मुस्लिम समाजातील व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची कोणतीही माहिती दिली नव्हती. या संदर्भात माझी संबंधित प्रतिनिधींशी बैठक झाली होती. त्यांनी केवळ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होत असल्याचं सांगितलं आणि त्यानुसारच पुढील पावले उचलण्यात आली, अशी माहिती संदीप कर्णिक यांनी माध्यमांना दिली आहे.

Dhananjay Munde : संत भगवानबाबांच्या नारळी सप्ताहला धनंजय मुंडे अनुपस्थित राहणार

संत भगवानबाबांच्या नारळी सप्ताहला धनंजय मुंडे अनुपस्थित राहणार आहेत. त्यासंदर्भात ट्विट करून त्यांनी माहिती दिली आहे. नामदेव शास्त्री यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहाला वंजारी समाजामध्ये विशेष महत्व आहे. दोनवर्षांपूर्वी याच कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांचे कौतुक केल्याने राज्यभरात चर्चा झाली होती. आता या सप्ताहाला धनंजय मुंडे जाणार नाहीत. त्यानंतर आता पंकजा मुंडे काय निर्णय घेता हे पाहावे लागणार आहे.

Gopichand Padalkar : तर पडळकर यांनी जात बदलून घ्यावी..

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर यांना काडीची अक्कल नाही ते विनाकारण पिसाळल्यासारखं करत आहेत. ज्या व्यक्तीला अक्कल नाही त्या व्यक्तीचे नाव गोपीचंद पडळकर आहे. गोपीचंद पडळकर किती फडणवीस यांचे तळवे चाटणार? एवढाच ब्राह्मणांचा पुळका येत असेल तर पडळकर यांनी ब्राह्मण महासंघाच अध्यक्ष व्हावं. पडळकर यांना ब्राह्मणांचा एवढाच पुळका येत असेल तर त्यांनी जात बदलून घ्यावी अशी टीका देखील संतोष शिंदे यांनी केली.

Sambhaji Raje : छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक हवे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले महाराजांचे मुंबईत स्मारक व्हावे. अरबी समुद्रात स्मारक करू म्हणतात. कुठंही करा, उदयनराजे किंवा उद्धव ठाकरे म्हणतात तसं राजभवनात देखील करा. गडकोट किल्ल्यांचे संवर्धन व्हावे. रायगडाप्रमाणे इतर किल्ल्यांचे जतन व्हावे. आम्ही फोर्ट फेडरेशन काढतोय, 25 किल्ले आम्ही संवर्धित करणार आहोत. महाराजांच्या जिवंत स्मारकाचे अर्थात किल्ल्यांचे जतन संवर्धन आवश्यक आहे. असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 30 एप्रिलला मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हफ्ता 30 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार असल्याची माहिती आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र जमा झाला होता. मात्र, एप्रिल महिन्याचा हफ्ता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच मिळण्याची शक्यता आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यातील गुडलक चौकात आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीवर सरकारचा निषेध. केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून घोषणाबाजी.

Shiv chhatrapati Sports Awards : छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, 89 खेळाडुंना पुरस्कार

राज्य सरकारच्या क्रीडा विभागाकडून शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. माजी महिला कबड्डीपटू संघटक शंकुतला खटावरकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर 89 खेळाडुंना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. क्रिक्रेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल,शिवम दुबे यांचा देखील पुरस्कारर्थींमध्ये समावेश आहे.

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मध्ये आणखी 2 पोलिसांचा समावेश

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये शासन निर्णयानुसार पोलिस हवालदार राजू वंजारे आणि पोलिस नाईक अनिल मंदे यांचा समावेश करण्यात आला आहे..

Nashik Saat Peer Dargah : दर्गा दगडफेक प्रकरणी 25 जणांना अटक

नाशिकमधील सातपीर दर्ग्यावरील कारवाईला विरोध करताना जमावाने दगडफेक केली होती. यापैकी 25 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणी एकूण 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

New Education Policy: पहिलीपासून हिंदी सक्तीची!

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा शिकवली जाणार आहे.

अजितदादांच्या स्वागतासाठी रोहित पवारांचे बॅनर

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जामखेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये काही बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये रोहित पवार मित्र परिवाराकडून अजित पवार यांचे स्वागत करणार देखील बॅनर लावण्यात आला आहे.

Nashik Saat Peer Dargah : सुप्रीम कोर्टाची दर्ग्यावरील कारवाईला स्थगिती

नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील सातपीर दर्गा महापालिकेने जमीनदोस्त केल्यावनंतर आता सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.