मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च न्यायालयाने बजावलं समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Marathi April 17, 2025 08:28 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावलं आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2024 विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी निवडणूक निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरच आज सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगाने नियमांचे पालन न केल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आला आहे. यातच आता न्यायलयाने फडणवीस यांना समन्स बजावलं असून त्यांना 8 मे रोजी सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

प्रफुल्ल गुडधे यांचे वकील पवन दहत म्हणाले की, “न्यायाधीश प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने मुख्यमंत्री फडणवीस यांना 8 मे रोजी उत्तर देण्यासाठी समन्स बजावले आहे.” गुडधे यांचे वकील दहत यांनी दावा केला आहे की, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत अनेक अनिवार्य तरतुदींचे पालन करण्यात आले नव्हते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.