पुण्यात चितळे बंधू मिठाईवालेंची फसवणूक; नाव वापरत दुसऱ्याच चवीच्या बाकरवाडीची बाजारात विक्री, क
Marathi April 17, 2025 08:28 PM

पुणे: असं म्हणतात पुण्यातील चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी ही फक्त पुण्यापूर्ती मर्यादित नसून तिची चव साता समुद्रा पार पोचली आहे. पुण्यातील अनेक नागरिक विदेशात नोकरी किंवा इतर कारणासाठी स्थायित आहेत. मात्र आजही त्यांच्या जिभेवर चितळेच्या बाकरवडीची चव रेंगाळते. असं असतानाच आता चितळ्यांच्या बाकरवडी ची बनावट विक्री कोण करतंय? हे ऐकून पुणेकरांना तर नक्कीच धक्का बसला असेल पण होय चितळे बंधू मिठाईवाल्यांची बाकरवडी त्यांच्याच नावाने कोणीतरी बाजारात विकतय. का काय आहे हा प्रकार पाहूया.

पुण्यातील नामांकित खाद्यपदार्थांचा ब्रँड असलेलं चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी ही फक्त पुण्यापूर्तीच नव्हे तर संपूर्ण भारतात तसेच विविध देशात सुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र आता याच चितळे बंधूंच्या बाकरवडी ची बनावट विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाखरवडी ची बदल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची दखल घेत फिर्यादी यांनी बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून “चितळे स्वीट होम” नावाने विक्रीस असणाऱ्या बाकरवडीचे पाकिटे खरेदी केली. चितळे स्वीट होम नावाने असणारे बाकरवडीची पाकिटे व आमच्या नियमीत तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसुन आली.

“चितळे स्वीट होम” यांनी चितळे बंधु मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून  चितळे बंधु मिळाईवाले यांचे असल्याचे भासवुन, नावाचा गैरवापर करुन फसवणुक केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी “चितळे स्वीट होम” चे प्रमोद प्रभाकर चितळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही खात असलेली चितळेंची बाकरवडी ही फक्त आणि फक्त तिथे बंधू मिठाईवाले यांचीच आहे ना एकदा तपासून घ्या नाहीतर तुम्हाला देखील चितळेंच्या बाकरवडीच्या नावाखाली फसवणूक केली जाईल होय ही फसवणूक आर्थिक नसली तरीसुद्धा पुणेकरांच्या जिव्हारी लागणारी आहे हे मात्र नक्की.

सर्व माहिती सारखीच वापरली

चितळे स्वीट होम यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधू मिठाईवाले यांचे असल्याचे भासवून, नावाचा गैरवापर करुन फसवणूक केली असं या तक्रारीत म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितळे बंधू मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजे रांजे येथे बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लॉन्ट आहे. याशिवाय पर्वती इंडस्ट्रीयल, टिमवि कॉलनी मुकुंदनगर याठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिटस् आहेत.

चव बदलल्याच्या अनेक तक्रारी आल्या

गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाखरवडीची चव बदल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची दखल घेत फिर्यादी यांनी बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून ‘चितळे स्वीट होम’ नावाने विक्रीस असणाऱ्या बाकरवडीचे पाकिटे खरेदी केली. चितळे स्वीट होम नावाने असणारे बाकरवडीची पाकिटे आणि चितळे बंधूंच्या नियमीत तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसून आली.

खरेदी केलेल्या पाकिटांची तपासणी केली असता बाकरवडीमध्ये तफावत असल्याचे फिर्यादी यांना आढळून आले. तसेच त्या पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी customercare@chitalebandhu.in कस्टमर केअर नंबर 9922944482, व वेबसाईट www.chitalebandhu.in डिटेल्स हे पाकिटांच्या साईड पट्टीवर हुबेहुब छापले असल्याचे दिसून आले.

अशाप्रकारे ‘चितळे स्वीट होम’चे प्रोपा प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळे बंधु मिळाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती स्वतःचे प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर वापरले. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करुन चितळे बंधू मिठाईवाले यांची फसवणूक केल्याचे समोर आलं आहे. तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता कलम 318(2), 350, 66(सी), 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा – Chitale : चितळे बंधूंच्या नावावर पुण्यात बनावट बाकरवडीची विक्री, ‘चितळे स्वीट होम’वर गुन्हा दाखल

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.