सामायिक बाजार: काय करावे, काय करावे, कोणत्या प्रकारची अडचण!
Marathi April 18, 2025 05:31 PM

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">अशी काहीशी गत ही सामान्य गुंतवणूकदारांची झाली आहे, आणि अशात ट्रम्प तात्या काय पुढे करतील हे कुणालाच ठाऊक नाही, अश्यात सुमारे ४ वर्षे सतत हिरवळ दाखवणारा बाजार थोडा थकलाय म्हणता म्हणता पुन्हा एक झळ बाजाराला अशी जोरात बसली की आपापले पोर्टफोलिओ कधी लाल सड्यात माखून निघाले के कळले सुद्धा नाही. ज्यांनी कुणी मागील २ वर्षात गुंतवणूक केली आहे त्यांना तर ही झळ खूप सोसावी लागली, मात्र जे दीर्घावधीचे गुंतवणूकदार आहे, ज्यांच्या एसआयपी या मागील 5 वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरु आहे त्यांना मात्र तुलनात्मक कमी नुकसान झाले आहे. आता हा प्रश्न भेडसावतो तुम्हा आम्हा सगळ्यांना, की हे बाजार कधी रिकव्हर करेल…..?? आपण हे बघायचा प्रयत्न करूया की मागील काही वर्षात जेव्हा जेव्हा बाजार पडले तेव्हा ते किती दिवसात रिकव्हर झाले.
वर्ष  क्रॅशचे कारण निफ्टी ची टक्केवारीत घसरण सेन्सेक्सची टक्केवारीत घसरण रिकव्हरीचा काळ
 
१९९२ हर्षद मेहता अस्तित्वात नव्हती ५५.००% २ वर्षे 
१९९७ एशियातील आर्थिक संकट  ४३.००% ४०.००% १ वर्ष
२००० डॉट कॉम फुगवटा  ४५.००% ५०.००% ३ वर्ष 
२००४ राजकीय अस्थिरता  १५.००% १६.००% १ वर्ष 
२००८ जागतिक आर्थिक संकट  ६०.००% ६०.००% २ ते अडीच वर्ष 
२०१५ चीन आर्थिक संकट  २७.००% २७.००% १ वर्ष
२०२० कोविड  ४०.००% ४०.००% १ ते दीड वर्ष 
२०२२ रशिया युक्रेन युद्ध  १८.००% १८.००% १ वर्ष
    
म्हणजे जेव्हा जेव्हा बाजारात पडझड झाली तेव्हा तेव्हा बाजार जास्तीतजास्त सुमारे २ ते अडीच वर्षात बाजाराने स्वतः सावरले आहे. यात एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, ती म्हणजे मागील ५ वर्षांच्या आधी पर्यंत आपण बहुमतांशी बाजाराच्या रिकावरी साठी म्हणा किव्वा कुठल्याही मूव साठी परदेशीय गुंतवणूकदारांवर अवलंबून असायचो पण आज ते चित्र बदलले आहे. आज कुठल्याही महिन्यात २५ हजार कोटींच्या सुमारास देशांतर्गत गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. त्यामुळे आधी ची डिपेंडंसी असायची ते आता आपण सक्षम झालो आहे.
ह्या पलीकडे जाऊन खूप लोक एक चूक करतात कि जसे बाजार पडते तसेच घाबरून नुकसानीत पोर्टफोलिओ विकतात आणि बाहेर येऊन एफ डी करतात, त्यात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आरबीआय व्याज दर कमी करत असते, म्हणून एक म्युचुअल फंड किंवा शेअर बाजारात नुकसान होतं, एक एफ डी मध्ये पण नुकसान होतं, आणि आपला एकूण अनुभव हा नकारत्मक होऊन जातो. इतिहासाचे आकडे तरी हे सांगतात आहे कि घाबरून जाण्याचे कारण नाही, बाजारात पडझड, सावरणे हे चालत राहते. एकदा आपल्या आर्थिक सल्लागाराला हे विचारून घ्या कि आपण निवडलेले प्रोडक्ट बरोबर आहे कि नाही. बाकी पेशंस हाच ह्या व्यवसायातील विजयामागाचे गणित आहे. 
तेव्हा आरामात आपली एस आय पी सुरु ठेवा, शक्य असेल तर अधिकचे पैसे गुंतवू शकत असाल तर ते बघा, आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचे आपल्या अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवा…जगात सगळ्यात जास्त विश्वास असलेली, फांदामेंतली मजबूत असलेली अर्थव्यवस्था म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आहे. बघा पटतंय का?? 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.