आयपीएलसोबत पाकिस्तानमध्ये सुपर लीग स्पर्धाही सुरु आहे. मात्र या स्पर्धेकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. इतकंच काय तर चाहते मैदानात बसून मोबाईलवर आयपीएल सामने पाहत असल्याचे व्हिडीओही व्हायरल होत आहे. असं असताना पाकिस्तान प्रीमियर लीगमधील काही प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. शुक्रवारी कराची किंग्स आणि क्वेटचा ग्लॅडिएटर्स यांच्यात नॅशनल स्टेडियममध्ये सामना पार पडला. हा सामना कराची किंग्सने 56 धावांनी जिंकला. या सामन्यात एक प्रकार असा घडला की त्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. कराची किंग्सचा वेगवान गोलंदाज हसन अलीने अबरार अहमदला बाद केलं आणि त्याची खिल्ली उडवली. त्याला बाद केल्यानंतर त्याला आवाज दिला आणि त्याच्याच स्टाईलमध्ये सेलीब्रेशन केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियाने वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या डावात 19व्या षटकात हा प्रकार घडला. हसन अलीने अबरारला एक यॉर्कर लेंथ चेंडू टाकला. अबरार हा चेंडू खेळण्यासाठी बाहेर निघाला आणि जोरात बॅट फिरवली. पण त्या दरम्यान चेंडू स्टंप्स घेऊन गेला होता. यावेळी काही कळायच्या आत अबरारला हाक मारली आणि त्याच्याच स्टाईलमध्ये सेलीब्रेशन केलं. त्यानंतर त्याच्या जवळ गेला आणि त्याची गळाभेट घेतली. दोघांच्या चेहऱ्यावर हसू होतं.
अबरारने मान हलवण्याचा सेलीब्रेशन भारत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान केलं होतं. तेव्हा शुबमन गिलला बाद केल्यानंतर त्याने तसं केलं होतं. मात्र पाकिस्तानच्या पराभवानंतर अबरार सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला होता. दरम्यान, हसन अलीने कराचीला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली . त्याने चार षटकात 27 धावा देत 3 गडी बाद केले.
विजयानंतर कराची किंग्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, ‘सुरुवातीपासूनच विन्सने ज्या पद्धतीने खेळ केला त्यावरून आम्हाला माहित होते की जर आपण 15 व्या षटकात खेळू शकलो तर आमची धावसंख्या चांगली असेल. आम्हाला माहित होते की तो नबी या विकेटवर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि त्याने ते केले. दव पडला नव्हता आणि आम्हाला माहित होते की पृष्ठभाग संथ असणार आहे. मी पॉवरप्लेमध्ये विकेट शोधण्यास सांगितले आणि त्यांनी निश्चितच ते केले.’