तपोवन परिसरातील जुन्या सायखेडा रोडवरील लोकेश लॅमिनेट्स या प्लायवूडच्या गोडावानाला रात्री मोठी आग लागून संपूर्ण गोडाऊन बेचिराख झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. रात्रीपासून 40 पेक्षा जास्त अग्निशामक दलाचे बंब आग वीजवण्यासाठी सतत कार्यरत आहेत. नाशिक शहर नाशिक रोड सिडको सातपूर पंचवटी व मालेगाव येथील अग्निशामक पंपांना बोलवण्यात आले होते. 50 पेक्षा जास्त अग्निशमन कर्मचारी रात्रीपासून आग विझवण्यासाठी मेहनत घेत होते. (Lokesh Laminates plywood godown in Tapovan burnt down)
आग एवढी मोठी होती की दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत देखील दुमसत होती. संपूर्ण प्लायवूडचे गोडाऊन आगीमुळे बेचिरख झाले. परिसरात नागरी वस्ती नसल्याने मोठा अनर्थ टळला.