नाशिक शहरातील वडाळा नाका येथून ट्रक व भंगारमालाची चोरी करणा ऱ्या दोघांसह ट्रकमालकाला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने धुळे येथील लळींग टोलनाका परिसरात सापळा रचून अटक केली. विशेष म्हणजे ट्रकमालकाच्या सांगण्यावरून दोघांनी ट्रक व मालाची चोरी केल्याचे समोर आले आहे. (Truck owner turns out to be thief; Two arrested from Travels, stolen truck scrapped, detained at Lalling toll plaza)
सालीम रशिद शेख (वय १८, रा. हरिमंजील, द्वारका, नाशिक), नाविद आरिफ शेख (२१, रा. गल्ली नं. १४, घर नं. २, साठेनगर, वडाळा, नाशिक), ट्रकमालक साहिल हनिफ शेख (वय २७, रा. कथडा, जुने नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
द्वारका वजन काटा, सर्व्हिस रोडजवळील वडाळा नाका, नाशिक येथून भंगारचा माल भरलेला ट्रक ३ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास चोरीस गेला होता. याप्रकरणी स्क्रॅपचा माल असलेले व्यावसायिक आनंद नंदकिशोर पंचारिया यांनी मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई नाका पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस समांतर करत होते.
गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूल व पोलीस हवालदार विशाल काठे यांना चोरीला गेलेला ट्रक ज्या मालकाचा आहे, त्यानेच ट्रक व ट्रकमधील भंगार चोरी केला आहे. चोरीच्या मालातील अर्धा हिस्सा द्यावा, असे ट्रकमालकाच्या सांगण्यावरून सालीम शेख याने त्याचे साथीदार नाविद शेख व वाईद, चालक सोनू उर्फ फराहान यांच्या मदतीने चोरून नेलेल्या ट्रक व भंगार मालाची विल्हेवाट लावली. संशयित सालीम शेख व नाविद शेख हे राजस्थान येथून ट्रॅव्हल्सने मालेगावकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. ही बाब पोलिसांनी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शासकिय व खासगी वाहनाने धुळे येथील लळींग टोलनाका परिसरात सापळा रचला. पथकाने खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी ट्रकमालक शेखच्या सांगण्यावरून ट्रक व मालाची चोरीची केल्याची कबुली दिली. आरोपींना पुढील कारवाई कामी मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या दिले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके, यांच्या खाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रवींद्र बागूल, हवालदार विशाल काठे, प्रशांत मरकड, प्रविण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, नाझीमखान पठाण, रोहिदास लिलके, महिला पोलीस कोकणी, नाईक विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, अंमलदार अमोल कोष्टी यांनी केली.