Tea And Coffee : रिकाम्यापोटी चहा-कॉफी पिण्याचे दुष्परिणाम
Marathi April 18, 2025 08:27 PM
सकाळी उठल्यावर अनेकांना हातात चहा किंवा कॉफी लागते. उठल्यावर गरमागरम चहा किंवा कॉफी घेतली नाही तर त्यांचा दिवस सूरू होत नाही. काहींना तर दिवसभर चहा-कॉफी घेण्याची सवय असते. तज्ञांच्या मते, चहा-कॉफीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक असते. यासह तुम्हाला रिकाम्यापोटी चहा-कॉफी घेण्याची सवय असेल तर यामुळे अनेक शारीरिक समस्यांना आमंत्रण मिळू शकते. तुम्हालाही अशी सवय असेल तर आजच ही सवय सोडा. आज आपण जाणून घेऊयात रिकाम्यापोटी चहा-कॉफीच्या सेवनाने आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात.
- रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफी तुमच्या आतड्यांसाठी योग्य नाही. तुम्ही जर रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफी पित असाल तर यामळे पोटात आम्ल वाढते. पोटात आम्ल वाढल्याने ऍसिडिटी, गॅस, पोट फुगणे अशा तक्रारी सुरू होतात.
- रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफी आतड्यांसाठी हानिकारक आहेत. यामुळे पोटात आम्ल वाढते. जेव्हा पोटात आम्ल वाढते तेव्हा ऍसिडिटी, गॅस आणि पोट फुगणे यासारंख्या तक्रारी जाणवतात.
- रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफी नियमित प्यायल्यास पोटात अल्सर देखील होऊ शकतो.
- रिकाम्यापोटी चहा, कॉफीच्या सेवनाने शरीराची पोषकतत्त्वे शोषण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे शरीरात पोषकतत्वांची कमतरता निर्माण होते. यामुळे कुपोषणाची समस्या निर्माण होते.
- रिकाम्यापोटी कॅफिन शरीरात गेल्यास मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर रिकाम्यापोटी चहा,कॉफी पिण्याची सवय बंद आजच बंद करा.
- चहा-कॉफीमध्ये असलेले ऍसिड दात आणि हिरड्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.
पुढील पेये प्यावीत –
- सकाळी तुम्हा व्हीट ग्रास मिसळलेल्या पाण्याचे सेवन केल्यास पचनतंत्र व्यवस्थित कार्य करते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाची तक्रार जाणवत नाही.
- तुम्हाला आवळ्याते सरबतही पिता येईल. यासाठी कोमट पाण्यात एक किंवा दोन चमचे रस मिसळून प्यावा लागेल.
सकाळचा नाश्ता कसा असावा
सकाळी पौष्टिक नाश्ता करावा. यात तुम्ही उठल्यावर भिजलेले बदाम खाऊ शकता. याशिवाय नाश्त्यात दलियाचे सेवन करता येईल. दलिया आवडत नसेल तर विविध पोषकतत्वांची परिपूर्ण असे अंड खाता येईल.
हेही पाहा –