Kesari Chapter 2: अक्षय कुमार, अनन्या पांडे आणि आर. माधवन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'केसरी चॅप्टर 2' या ऐतिहासिक चित्रपट गुड फ्रायडेच्या दिवशी आज, १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला आहे. अक्षयचा 'केसरी चॅप्टर 2' चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ८ ते ९ कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'केसरी चॅप्टर 2' हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'केसरी' चित्रपटाचा सिक्वेल असून, हा चित्रपट जलियांवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देणाऱ्या सी. शंकरन नायर यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केले असून, धर्मा प्रोडक्शन्स, लिओ मीडिया कलेक्टिव आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटात ने सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारली आहे, तर अनन्या पांडे त्याच्या सहाय्यक वकीलाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटात दोघांमध्ये कोणताही रोमँटिक संबंध नाही, हे विशेष आहे. चित्रपटाची कथा रघु आणि पुष्पा पलट यांच्या 'द केस देंट शुक द एम्पायर' या पुस्तकावर आधारित आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे आणि त्यामुळे चित्रपटाच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई होण्याची अपेक्षा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळेही प्रेक्षक या चित्रपटाला पसंती देतील अशी अपेक्षा आहे. चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी कलाकारांनी गोल्डन टेम्पलमध्ये जाऊन प्रार्थना देखील केली आहे.
'' हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक घटना नव्हे, तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एका महत्त्वपूर्ण लढ्याची कथा आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सी. शंकरन नायर यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या धैर्याची कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.