भाई, हा वेगळाच माणूस! Rohit Sharma सामन्यानंतर प्रेक्षकांमसोबत मजा मस्ती करताना दिसला, खोडकर हिटमॅनचा Video Viral
esakal April 18, 2025 08:45 PM

Rohit Sharma funny interaction with fans after IPL match : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची गाडी रुळावर आल्याचे दिसत आहे. दिल्लीत विजय मिळवून मुंबईत परतलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने वानखेडेवर गुरुवारी सलग दुसरा विजय नोंदवला आहे. मात्र,रोहित शर्माचा फॉर्म अद्यापही संघासाठी चिंतेचा विषय आहे.

यंदाच्या हंगामातच रोहित शर्माचं प्रदर्शन निराशाजनक राहिलं आहे. रोहितने पाच सामन्यात केवळ ८२ धावा केल्या आहेत. गुरुवारी हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही तो २६ धावांवर बाद झाला. या सततच्या खराब फॉर्ममुळे आता रोहितवर टीका होत असून त्याचे चाहतेही नाराज आहेत.

अशातच रोहितचा एक व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होतो आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतरचा हा व्हिडीओ असून तो चाहत्यांबरोबर मस्ती करताना दिसतो आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर तूफान व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, रोहितने आयपीएल २०२३ नंतर २४.३९ च्या सरासरीने ८०५ धावा केल्या आहेत. गेल्या पाच हंगामांत त्याने फक्त एकदाच ४०० हून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. त्याच्या या खराब फॉर्ममुळे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीवरही परिणाम होतो आहे.

रोहितने २५७ आयपीएल सामन्यांत २९.७२ च्या सरासरीने ६ हजार ६२८ धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्याच नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलं आहे. मात्र, सध्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.