इराणवर आता अमेरिकेची चांगलीच खप्पामर्जी झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दखल दिली नसती तर ८ मेची तारीख इराणसाठी काळरात्र ठरली असती. हे स्वत: च ट्रम्प यांनी कबूल केले आहे. त्यांनी हे मान्य केले आहे की इराणवर इस्रायल हल्ला करणार होता. तसेच ट्रम्प यांनी ही म्हटले होते की हल्ला करण्याचा निर्णय मी काही रद्द केलेला नाही त्यानी इराणला शेवटचा अल्टीमेटम दिला आहे.
८ मे रोजी इस्रायलच्या एअरफोर्सने इराणच्या न्युक्लीअर प्लांटवर मोठा हल्ला करण्याची तयारी पूर्ण केली होती. परंतू ट्रम्प यांनी त्या हल्ल्या आधीच नेतान्याहू यांना भेटीसाठी व्हाईटहाऊसला बोलावले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यात मोठी बातचित झाली. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे की हल्ल्याची योजना तयार आहे आणि योग्य वेळी इराणवर हल्ला केला जाईल. यावर ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना सल्ला दिला की यावेळी इराणवर हल्ला करणे योग्य नाहीए…
८ मे रोजी इस्रायलची वायू सेना इराणच्या आण्विक तळांवर जोरदार हल्ले करणार होती. परंतू ट्रम्प यांनी या हल्ल्या आधी नेतान्याहू यांना भेटीसाठी व्हाईटहाईस येथे निमंत्रण धाडले. नेतान्याहू यांना ट्रम्प यांचा सबूरीचा सल्ला काही पटलेला नाही. त्यानी म्हटलेय की इराणवर ताबतोब हल्ले करण्याची माझी इच्छा आहे. ट्रम्प यांनी त्यावेळी त्यांना पुन्हा समजावले की आता इराणशी बोलणी चालू आहेत. त्यामुळे आता थोडा सबुर घ्या. मात्र, नेत्यान्याहू यांनी इराणला जादा संधी देणे योग्य नसल्याचे सांगितले. त्यांच्या या वाक्याने ट्रम्प यांचा देखील संयम ढळला आहे. ते म्हणाले की जर इस्रायलने इराणवर हल्ला केला तर अमेरिकेला इस्रायलचा साथ सोडावी लागेल. नेतान्याहू यांना ही गोष्ट समजली.त्यानंतर नेतान्याहूंनी ठीक आहे इराणला एक संधी देऊया. परंतू त्यांना काही कठोर अटी पाळाव्याच लागतील.
परंतू इराण आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्याला ना ट्रम्प यांच्या धमकीचा काही पडलंय. ना नेतान्याहू यांच्या इशाऱ्याचे…तेहरान येथून युरेनियमचा वाढता वापर आता व्हाईट हाऊसच्या पांढऱ्या रंगाला काळा करत आहे. ट्रम्प या आगीला विझवत आहेत. परंतू इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने आगीत तेल ओतले आहे. अमेरिकेच्या धमक्यांना भिक न घालता. परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट म्हटले की आम्ही आमच्या न्युक्लीअर प्रोग्रॅमसाठी युरेनियमचा वापर थांबवणार नाही. मग भले अमेरिका काहीही करो.
इराणचा इशारा हा केवळ ट्रम्प यांच्याशी नसून थेट नेतान्याहूना देखील दिला आहे. इराणच्या न्युक्लिअर प्लांटवर एक हल्ला करण्यासाठी इस्रायल उतावीळ झाला असताना एक वक्तव्य IAEA चीफ राफेल ग्रॉसी यांनी देखील केले आहे. ते म्हणाले की इराण अणू बॉम्ब बनविण्याच्या अगदी जवळ आहे. तो कोणत्याही क्षणी युरेनियमपासून अणूबॉम्ब बनवू शकतो. ट्रम्प त्यांच्या राजकीय मुत्सदीगिरीतून इराणकडे पाहत आहेत आणि मात्र खामेनी झुकण्यास तयार नाहीत.