Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचे आंदोलन
Saam TV April 18, 2025 09:45 PM
Hingoli News: बळीराजाने कष्टाने पिकवलेली हळद चोरीला

दोन लाखांची हळद चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ

पोलिसांनी शोध घ्यावा अन्यथा जीवाचे बरंवाईट करणार शेतकऱ्याने दुःख व्यक्त करत केली मागणी

Nahik News: नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

- काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन

- नाशिकच्या रेड क्रॉस सिग्नल आंदोलन

- सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन

- भ्रष्टाचारी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करावी या, मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आक्रमक

- काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे जाणाऱ्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड

Nashil News: नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरण, मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे १४००- १५०० ज्ञात अज्ञातांवर गुन्हे दाखल

- पोलिसांवर दगडफेक प्रकरणी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी...

- MIM शहराध्यक्ष मुख्तार शेख याला ही नाशिक पोलिसांनी दगडफेक प्रकरणी केली अटक...

- गुन्हा दाखलमध्ये काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार पक्षासह आता MIM च्या शहराध्यक्ष गुन्हा...

बीड सायबर विभागातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला पोलीस खात्यामधून बडतर्फ

सायबर विभागातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासल्याचे नवनवीन व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल झाले

यामध्ये निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासल्याने पोलीस खात्यावरती आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरती गंभीर आरोप केले आहेत

त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच्या बोगस एन्काऊंटरची ऑफर आल्याचे खळबळ जनक दावा रंजीत कासलेने केला होता

रणजीत कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्याच्यावरती बडतर्फेची कार्यवाही करण्यात आली आहे

Nashik: नाशिक जिल्ह्यात CNG विक्री बंद ठेवण्याचा इशारा

- CNG पुरवठा करणाऱ्या MNGL च्या मनमानी कारभाराला कंटाळून नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनचा निर्णय

- २६ एप्रिलपासून CNG विक्री बंद ठेवण्याचा इशारा

- नाशिक जिल्ह्यात CNG पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यानं CNG पंपचालक आणि ग्राहक त्रस्त

- MNGL कडून सुरळीत पुरवठा होत नसल्यानं पंप चालकांसह ग्राहकांना मनस्ताप

- ३ - ४ तास रांगा लावून CNG भरण्याची ग्राहकांवर वेळ

- CNG च्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे CNG पंपावर भांडणं आणि वादावादीचे प्रकार

- दररोजच्या भांडणं आणि वादावादीमुळे CNG पंप चालक त्रस्त

- CNG चा पुरवठा सुरळीत करण्याची पंप चालकांची मागणी

- दिवसातून किमान १० तास सुरळीत CNG चा पुरवठा करण्याची पेट्रोल डीलर असोसिएशनची मागणी

- २५ एप्रिलपर्यंत CNG पुरवठा सुरळीत न झाल्यास २६ एप्रिलपासून CNG विक्री बंद करण्याचा इशारा

Mumbai - Pune Expressway: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन आली खाजगी वाहनाने रस्त्यावर

सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटक पर्यटन स्थळावर आपल्या खाजगी वाहनाने जाण्यास निघाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वेळेवर वाहतूक कोंडी झाली आहे.

खंडाळा घाट परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

आज गुड फ्रायडे च्या सुट्टीला जोडूनच शनिवार व रविवार आल्याने या सलग तीन दिवस सुट्ट्यांच्या निमित्ताने पर्यटन स्थळावर जाण्याचा चंग बांधत मोठ्या प्रमाणात पर्यटक खाजगी वाहनातून घराबाहेर पडले आहेत..

वाहतूक कोंडी पासून सुटका मिळावी या करता पहाटेच पर्यटक घराबाहेर पडले मात्र मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांना खंडाळा ते खोपोली दरम्यान वाहतूक कोंडी मध्ये अडकून पळावे लागेल आहे.

Tapi River: तापी नदीपात्रात सर्रासपणे सोडले जात आहे रेल्वेचे सांडपाणी

भुसावळ शहराला लागू तापी नदीचं मोठं पात्र आहे.

तापी नदीच्या माध्यमातून भुसावळ शहरासह परिसरातील इतर गावांचा पाण्याचा प्रश्न दूर होतो.

मात्र या तापी नदी पात्रात सर्रासपणे सांडपाणी सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर तापी नदी पात्रातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे.

कुठल्याही प्रकाराची प्रक्रिया न करता हे सांडपाणी तापी नदीपात्रात सोडल्यानंतर भुसावळ तालुक्यातील साकेगाव शहर इतर गावं तसेच एमआयडीसी परिसरातील उद्योगांना सर्रासपणे पाणीपुरवठा केला जातो.

त्यामुळे एकीकडे पाणी टंचाईचा संकट असताना दुसरीकडे सर्रासपणे दूषित पाणी नदीपात्रात सोडल्याने याचा मोठा फटका संबंधित गावांना बसत असल्याचे समोर आले आहे.

Nanded: देगलूर शहरातील विद्युत रोहित्राला लागली आग

नांदेडच्या देगलूर शहरातील रोहित्राला आग लागून डीपी जळला आहे.

रोहित्रा मध्ये ऑइल नसल्यामुळे आणि वाढत्या तापमानामुळे हे आग लागल्याची माहिती आहे.

रोहित्रामधून ऑइल गळती होत असतानाही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.

Ahilyanagar: श्रीगोंदा आज दुसऱ्या दिवशीही राहणार बंद

संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धार मागणीसाठी बंदची हाक...

शेख महंमद महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्यांकडून जीर्णोद्धारास आडकाठीचा आरोप...

ग्रामस्थांकडून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच...

रात्री आंदोलनस्थळी किर्तनाचा कार्यक्रम...

जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत ठिय्या आणि बंद आंदोलनावर ग्रामस्थ ठाम...

Dharashiv: धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये गोरक्षकांचे आमरण उपोषण

प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी

धाराशिव शहरातील कत्तलखान्यात होणारी गोवंश हत्या बंद करावी या प्रमुख मागणीसाठी उपोषण सुरू

पुणे आणि धाराशिव मधील गोरक्षकांचे धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये उपोषण

धाराशिव मधील कत्तलखान्यात गोवंश हत्या करून हे मांस हैदराबादसह इतर शहरात पाठविले जात असल्याचा गोरक्षकांचा आरोप

पोलीस अधीक्षक यांना कत्तलखान्यामध्ये गोहत्या होत असल्याची माहिती देऊनही कारवाई न झाल्याने उपोषण सुरू

पोलीस प्रशासन,खासदार,आमदार यांनी त्वरित लक्ष घालून कत्तलखाने बंद करावे अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे

म्हसळा येथील सर्व्हेअर ACB च्या जाळ्यात; ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील सर्व्हेअर विशाल रसाळ याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. रायगड ACB पथकाने माणगाव ST स्टँड येथे सापळा रचून ही कारवाई केली.

धाराशिवमध्ये गोरक्षकांचे आमरण उपोषण; कत्तलखान्यातील गोवंश हत्येवर बंदीची मागणी

धाराशिव शहरातील कत्तलखान्यात सुरू असलेल्या गोवंश हत्येच्या विरोधात गोरक्षकांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, उपोषणकर्त्यांनी कडक पावले उचलण्याची मागणी केली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात महिन्याभरापूर्वी दाखल झालेल्या १२३ नव्या सीएनजी बस सदोष

या बसची सेवा संचलनातून बंद करण्यात आली आहे.

सर्व बस संबंधित कंपनीकडे माघारी पाठविण्यात आल्या

बसमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच त्या मार्गांवर सोडण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला

हडपसर, नतावाडी, शेवाळवाडीसह अन्य डेपोंमधून या बसचे संचलन सुरू होते.

मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून या बस सेवेतून काढून टाकण्यात आल्या

Maharashtra Politics: लाखवड गावातील 40 गावांना जोडणारा रस्त्याचे काम बंद पाडल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त

लाखवड या गावातील ग्रामीण मार्ग क्रमांक 139 या मुख्य रस्त्याच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी मंजूर करून दिलेला होता.

परंतु गावातील काही लोकांनीच या रस्त्याला विरोध करत या रस्त्याचे काम बंद पाडले.

आज एकनाथ शिंदे यांना या रस्त्यावरच्या कामाचे बाबत निवेदन देण्यासाठी ग्रामस्थ त्यांच्या दरे गावी आले होते.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट एसपी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फोन करूनच या रस्त्याचे काम बंद पाडणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामजयंती महोत्सवाला प्रारंभ

मोझरी गावातुन निघाली मानवसेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांच्या पथकांची शोभायात्रा..

ग्रामजयंतीच्या निमित्ताने मोझरी गावात विविध धार्मिक,सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन...

रविवारी महाकाला व काल्याचे कीर्तन.

दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती; राज्यात नव्या ६५ बाजार समित्यांना मंजुरी

संचालक मंडळाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राज्य शासनाने राज्यातील २१ जिल्ह्यांत ६५ नवीन बाजार समित्या मंजूर केल्या आहेत.

यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती मंजूर करण्यात आली आहे.

सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून,या बाजार समितीचे कार्यक्षेत्र उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर हे दोन तालुके आणि सोलापूर शहर हद्दवाढ भागातील १५ विकास संस्थांचा समावेश आहे.

या बाजार समितीची निवडणूक सुरू असतानाच राज्य शासनाने राज्यातील २१ जिल्ह्यांत नवीन ६५ बाजार समित्यांना मंजुरी दिली आहे.

यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती मंजूर करण्यात आली आहे.राज्यात अगोदर ३०५ बाजार समिती आणि ६२५ उपबाजार कार्यरत आहेत.

Sujat Ambedkar : सुजात आंबेडकर आज हिंगोलीत मृत्युमखी पडलेल्या महिलांच्या कुटुंबीयांना भेटणार

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आज हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावात दाखल होणार आहेत,

शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या सात महिला मजुरांचा ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने मृत्यू झाला होता या महिलांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत

दरम्यान राज्य शासनाने घोषणा करून देखील या महिलांच्या कुटुंबीयांना मदत मिळत नसल्याच्या तक्रारी आंबेडकर यांच्याकडे नातेवाईकांनी केल्या होत्या

या संदर्भात सुजात आंबेडकर प्रशासनाला जाब देखील विचारणार आहेत

गुलाबराव महाराज यांचं नाव मुंबईतील एशियाटिक लायब्ररीला द्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,घटना समितीचे सदस्य व अमरावतीचे सुपुत्र डॉ. पंजाबराव देशमुख यांचं नाव अमरावती विमानतळाला देण्याची मागणी अमरावती जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांनी केली,

90 टक्के लोकांची भूमिका आहे की डॉ.पंजाबराव देशमुख यांचे नाव मिळालं पाहिजे मला विश्वास आहे की पंजाबराव देशमुख यांचे नाव अमरावती विमानतळाला मिळेल तर गुलाबराव महाराज यांचं नावं मुंबईतील एशियाटिक लायब्ररीला देण्यात यावे

या लायब्ररीमध्ये गुलाबराव महाराज गेले होते तिथे कसे पुस्तकालावे तसं त्यांना सांगितलं होतं, अमरावती मंत्राला नाव देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे,

अमरावती जिल्हा हा पंजाबराव देशमुख यांचा म्हणून ओळखला जातो तर विमानतळाला पंजाबराव देशमुख यांचे नाव नाही दिलं तर जनताच सरकारला उत्तर देणार आहे. कारण 90 टक्के लोकांची इच्छा आहे असा इशारा मनसेचे पप्पू पाटील यांनी दिला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शेतीची फळझाडांची पाहणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी सुट्टीसाठी आले आहेत.

नेहमीप्रमाणे गावी आल्यानंतर त्यांनी गावात केलेल्या शेतीची पाहणी केली.

जनावरांच्या गोठ्यात जाऊन जनावरांना चारा खाऊ घातला.

गावी आल्यानंतर प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे हे शेतीत रंगलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत.

तसेच यावेळी सुद्धा सफरचंद,आंबा,बांबू अशा अनेक झाडांची त्यांनी लागवड केलेली असल्याने सध्याच्या या उन्हाळ्यामध्ये झाडांची काय परिस्थिती आहे त्याचे त्यांनी स्वतः शेतात जाऊन पाहणी केली

Jalgaon: ग्रामपंचायंतीच्या भ्रष्ट कामाची चौकशी करा, ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरु

जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथील ग्रामपंचायती प्रत्येक कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय त्या विरोधात ग्रामपंचायती समोर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले आहे..

घरकुल योजनेचा लाभ भूमिहीनाना सोडून श्रीमंत व्यक्तींना देणे, गावातील विकास कामे फक्त कागदावर पूर्ण व त्याची लाखो रुपयाची बिले काढून मोकळे, अश्या मनमानी कारभरा विरोधात जळगावजामोद तहसीलदाराकडे अनेक तक्रारी केल्या गेल्या

मात्र अद्याप कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायती समोरच आमरण उपोषण सुरु केले आहे..

जो पर्यंत ग्रामसेवका वर कारवाई होत नाही तोपर्यन उपोषण सोडणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्याने दिला आहे

येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेत एसटीला ४० लाखांवर उत्पन्न

येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा याञेत एसटी महामंडळाच्या धाराशिव विभाग कार्यालयाला ४० लाखांवर उत्पन्न मिळाले आहे.

येडेश्वरी याञेसाठी १३० बसच्या १ हजार ९७१ फेऱ्या झाल्या असुन यामध्ये १ लाख ९ हजार १२३ महीला व पुरुषांनी प्रवास केलाय येडेश्वरी देवीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने ज्यादा बसचे नियोजन करण्यात आले होते

भाविकांना योग्य सेवा मिळावी कोणतीही गैरसोय होवु नये यासाठी जिल्ह्यातील सर्वच आगारातून ज्यादा बस सुरू केल्या होत्या.

Yavatmal: पार्टटाइम जॉबच्या नावाखाली सव्वासहा लाखांनी फसवणूक

पार्ट टाइम जॉब देण्याच्या नावाखाली तब्बल सहा लाख 32 हजारांनी फसवणूक केल्याची घटना यवतमाळ शहरातील उमरसरा परिसरात उघडकीस आली असून याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात निशांत लाभणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रिया सनियाल या तरुणीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्या तरुणीची शोध पोलिस घेताहेत.

Akola: अकोल्यात दुर्मीळ 'अल्बिनिझम' पांढऱ्या चिमणीचं दर्शन

अकोल्यातल्या मुर्तिजापूरात दुर्मीळ पांढऱ्या चिमणीचं दर्शन झालंये..

मूर्तिजापूरातील राजुरा घाटे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात ही दुर्मीळ पांढऱ्या रंगाची चिमणी दिसून आलीये..

या दुर्मीळ पक्ष्याचे निरीक्षण शाळेतील पक्षीमित्र मनोज लेखनार यांनी केले.

लेखनार हे गेले चार वर्षे शालेयमध्ये चिमणी संवर्धनाचे कार्य करत आहेत. दरम्यान, ही पांढरी चिमणी अर्थातच 'अल्बिनो हाऊस स्पॅरो' असून, तिच्या शरीरातील मेलॅनिन या रंगद्रव्याचा पूर्ण अभाव असल्याने ती पूर्णतः पांढरी दिसतेये..

अकोलेकरांना 5 दिवसानंतर होणार पाणीपुरवठा, काटेपुर्णा प्रकल्पातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती 26.21 टक्के

अकोलेकरांना आता तब्बल पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होणारेय.

अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी कमी झाल्याने महापालिकेने हा निर्णय घेतलाय.

10 दिवसांपूर्वी अकोला शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा होत होताय. गेल्याच आठवड्यात महापालिकेने चार दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अंमलात आणला होताय.

मात्र, दिवसेंदिवस कमी होणारी पाणी पातळी पाहता महापालिकेने काल 16 एप्रिलपासून तब्बल 5 दिवसानंतर अकोलेकरांना पाणी देण्याचा निर्णय घेतलाय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.