अव्वल नंबरसाठी आज लढत होणार ब्लॉकबस्टर
Marathi April 19, 2025 08:25 AM

उद्याचा शनिवार हा क्रिकेटप्रेमींसाठी ‘ब्लॉकबस्टर’ ठरणार आहे. गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार असून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्यासाठी हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत.  यंदाच्या आयपीएल मोसमात दिल्ली कॅपिटल्सच्या झंझावाताने मुंबई वगळता इतर सर्व संघांना पराभवाचे पाणी पाजले आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर गुजरात दिल्लीला दुसऱ्या पराभवाची चव चाखवणार का? दिल्ली गुजरातला पराभूत करून प्ले ऑफसाठीची आपली दावेदारी अधिक मजबूत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्या दुपारी 3.30 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयम येथे गुजरात आणि दिल्ली यांच्यातील द्वंद्व अनुभवता येणार आहे. सध्या दिल्लीचा संघ तुफान फॉर्मात आहे. जेक फेजर हा दिल्लीला अद्याप धडाकेबाज सुरुवात करून देण्यात अपयशी ठरला असला तरी अभिषेक पोरेल हा तुफान फलंदाजी करत आहे. त्याला आता करुण नायर याची उत्तम साथ लाभत आहे, तर दुसरीकडे के. एल. राहुलच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत असून त्याला रोखण्यात गोलंदाजांना मेहनत करावी लागत आहे. तसेच स्टब्स आणि अक्षर पटेल यांची उत्तम साथ फलंदाजांना लाभत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.