घराची सजावट ही फक्त घर सुंदर बनवण्यासाठी नसते, तर त्यामुळे तुमचं मनही फ्रेश होत असतं. सजावट ही महाग वस्तूच वापरून होते असं काही नाही. अनेक स्वस्त वस्तू कल्पकपणे वापरून घर छान सजवता येतं. घरात प्रवेश करताना आपण निसर्गाच्या एका मुक्त कोपऱ्यात प्रवेश करतो असा ‘फील’ देणारं घर असेल तर मन आणखी प्रसन्न होतं. घराची सजावट करताना जर आपण पर्यावरणास अनुकूल सामग्री आणि पद्धती वापरल्या, तर आपण निसर्गाचे रक्षण करू शकतो. ‘ग्रीन डेकोरेशन’ हा एक ट्रेंड असून तो आरोग्यासाठीही चांगला आहे. छोट्या छोट्या गोष्टींद्वारे घराला पर्यावरणपूरक कसं बनवायचं याबाबत काही खास कानमंत्र बघू.
नैसर्गिक साहित्याचा वापरसजावटीसाठी बांबू, लाकूड, कापूस, ज्यूट यांसारख्या नैसर्गिक सामग्रीचा वापर करा.
प्लॅस्टिकऐवजी मातीची भांडी, लाकडी फर्निचर, ज्यूटचे कार्पेट अशा गोष्टींचा वापर करा.
रिसायकल केलेल्या लाकडाचे टेबल, शेल्फ्स वापरून वनसंपदेचे संरक्षण करा.
घरात हवाशुद्धी करणाऱ्या, घराला हिरवेपणा देणाऱ्या वनस्पती (उदाहरणार्थ, स्नेक प्लांट, मनी प्लांट, अलोव्हेरा) ठेवा.
हँगिंग गार्डन किंवा टेरेस गार्डन बनवा.
घरात ठिकठिकाणी फ्लॉवर अरेंजमेंट करून कृत्रिम प्लॅस्टिक फुलांऐवजी नैसर्गिक सौंदर्य निर्माण करा.
पारंपरिक बल्ब, ट्यूब्जऐवजी एलईडी लाइट्स वापरा.
सोलर-पॉवर्ड लँप बाहेरच्या भागासाठी लावा.
दिवसा नैसर्गिक प्रकाशासाठी मोठ्या खिडक्या आणि स्कायलाइट्सची योजना करा.
जुन्या वस्तूंचा पुनर्वापर
करून नवीन डिझाइन तयार करा (उदा. जुन्या बॉटल्समधून लँप, टायरचा सोफा किंवा इतर काही तरी).
जुन्या; परंतु चांगल्या फर्निचरची खरेदी करून त्यांना नवीन रूप द्या.
जुन्या कपड्यांपासून कुशन
कव्हर्स, पडदे शिवून वापरा आणि त्यांना खास तुमचा वैयक्तिक टच द्या.
व्हॉल्युटाइल ऑर्गेनिक कंपाऊंडमुक्त (VOC) पेंट्स वापरा.
नैसर्गिक रंगांसाठी जिथे शक्य आहे तिथं हळद, मातीचे रंग, चुना वापरा.
भिंतींवर हँडमेड मड वॉल आर्ट करून नैसर्गिक देखावा निर्माण करा. वारली पेंटिंगनेही एखादी भिंत पूर्णपणे रंगवू शकता.
इनडोअर कारंजी किंवा वॉटर फीचर्समध्ये रिसायकल वॉटर सिस्टम वापरा.
ड्राय लँडस्केपिंग (कमी पाणी लागणाऱ्या वनस्पती) करून गार्डन सजवा.
पर्यावरणास अनुकूल सजावट केल्याने आपले घर सुंदर दिसतेच; शिवाय ते आरोग्यदायी आणि टिकाऊही असते. थोड्या सर्जनशीलतेने आणि जागरूकतेने आपण निसर्गाचे रक्षण करत आपल्या घराला सुंदर बनवू शकतो.