Kesari 2 Box Office Collection : गुड फ्रायडेला 'केसरी 2'चा धुमाकूळ, अक्षय कुमारच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी
Saam TV April 19, 2025 03:45 PM

नुकताच अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'केसरी 2' (Kesari 2) चित्रपट पेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवसात बंपर कमाई केली आहे. 'केसरी 2' चित्रपट 18 एप्रिलला रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत आर माधवन आणि अनन्या पांडे देखील पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली, जाणून घेऊयात.

केसरी 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1

'2' गुड फ्रायडेच्या दिवशी रिलीज झाला आहे. त्यामुळे अनेकांना सुट्टी असल्यामुळे चित्रपटाला पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'केसरी 2' चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.50 कोटींची कमाई केली आहे. भविष्यात हा चित्रपट अनेक मोठ्या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो असे बोले जात आहे.

'केसरी चॅप्टर 2' मधून जालियनवाला बाग हत्याकांड या प्रकरणाचा उलगडा पाहायला मिळत आहे. 'केसरी चॅप्टर 2'मध्ये कुमार सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारत आहेत. जे वकिल होते. पांडे युवा वकील दिलरीत गिलच्या भूमिकेत दिसणार आहे. 'केसरी चॅप्टर 2' चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंग यांनी केले आहे.

'केसरी चॅप्टर 2' हा 21 मार्च 2019 साली रिलीज झालेल्या 'केसरी' चा सीक्वल आहे. 'केसरी' हा चित्रपट खूप गाजला. प्रेक्षकांनी याला खूप पसंती देखील दिली. 'केसरी' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत मख्य भूमिकेत परिणीती चोप्रा देखील पाहायला मिळाली. या जोडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. 'केसरी' चित्रपटाला आता 6 वर्ष पूर्ण झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.