पारगाव, ता. १९ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये कै. धोंडिभाऊ गेनुजी टाव्हरे आणि कै. चंद्रकांत शंकर हिंगे पाटील यांच्या बैलगाड्याने घाटाचा राजा किताब पटकाविला. बैलगाडा शर्यतीत एकूण १३२ बैलगाडे धावले विजेत्यांना दोन लाख ७८ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आल्याची माहिती यात्रा उत्सव समितीने दिली.
प्रथम क्रमांकात पहिला आलेला गाडा पवनकुमार अरगडे, सुनील हिंगे पाटील, व्दितीय क्रमांकात पहिला नितीन भरत खिलारी, तृतीय क्रमांकात पहिला बबन बालाजी शेवाळे, चतुर्थ क्रमांकात पहिला लक्ष्मण पोटफाडे यांचे बैलगाडे फळीफोडचे मानकरी ठरले. फायनलमध्ये प्रथम क्रमांक - हिंदकेसरी बैलगाडा संघटना, पंकज हिंगे पाटील, विष्णू हिंगे पाटील, व्दितीय क्रमांक - पांडुरंग सोनवणे, चव्हाण पाचुंदकर, तृतीय क्रमांक - एकनाथ हिंगे, सचिन मडके यांचा आला. आकर्षक बारीचे बक्षीस नवनाथ शेटे, हिंदकेसरी बैलगाडा संघटना यांच्या बैलगाड्याने पटकाविले. बैलगाडा विजेत्यांना एकूण दोन लाख ७८ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. बैलगाडा शर्यतीचे नियोजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख अजित चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य संजय जयसिंगराव हिंगे, माजी सरपंच पवन हिले, माजी उपसरपंच किशोर हिंगे, विनोद हिंगे, नवनाथ चव्हाण, विजय हिंगे, बाजीराव टेमकर, विराज हिंगे, सूरज हिंगे, सुधीर हिंगे, संतोष शेटे व यात्रा उत्सव समितीने केले.