गराडे, ता. १९ : बोपगाव (ता. पुरंदर ) येथील श्री काळभैरवनाथ चैत्री उत्सवानिमित्ताने बुधवारी (ता. १६), गुरुवारी (ता. १७) यात्रा पार पडली. यामध्ये गुरुवारी झालेल्या कुस्ती पाहण्यासाठी शौकिनांनी हजेरी लावली
त्यात १३५ मल्लांनी सहभाग घेतला. अनेक चितपट कुस्त्यांनी शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
यावेळी नीरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, योगेश फडतरे, प्रकाश फडतरे, रामभाऊ फडतरे, दयानंद फडतरे, कानिफनाथ फडतरे, शहाजी फडतरे, शिवाजी फडतरे, रायबा जगदाळे, सर्जेराव जगदाळे, बबन जगदाळे, साहेबराव फडतरे, दादासाहेब जगदाळे, म्हस्कू फडतरे, भीमाजी फडतरे, नागेश फडतरे, अशोक फडतरे, तुकाराम फडतरे, विश्वास फडतरे, साहेबराव जगदाळे, अनिल फडतरे, संभाजी फडतरे, निवृत्ती फडतरे, बाळासाहेब फडतरे, शहाजी शिंदे, काळूराम पवार, उत्तम फडतरे, सुनील फडतरे, माउली फडतरे, दीपक फडतरे, रवींद्र फडतरे, सुरेश फडतरे, तानाजी फडतरे, द. भ. फडतरे, सुभाष फडतरे, प्रमोद फडतरे, राजेंद्र फडतरे, तुळशीराम गोफणे उपस्थित होते.
सासवड, गराडे, सुपे, फुरसुंगी, बारामती, सोनोरी, भिवडी, काळदरी, नारायणपूर, झेंडेवाडी, दिल्ली, न्हावी, राजुरी, हडपसर, पांडेश्वर गावातून १३५ मल्लांनी सहभाग नोंदविला. पंच म्हणून पहिलवान विलास फडतरे, गणेश फडतरे , मोहन जगदाळे, राम फडतरे, सुनील फडतरे, माऊली फडतरे, नमन फडतरे, पांडुरंग फडतरे, भाऊसाहेब फडतरे, सूरज जगदाळे, अनिकेत फडतरे, अमोल फडतरे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
रघुनाथ जगताप, प्रतीक जगताप, अमित गायकवाड, आदित्य जगताप, किशोर बसाळे, अनिकेत गायकवाड, सुरेश पाटील, महादेव कचरे, भय्या जगताप या मल्लांनी कुस्ती आखाड्यात हजेरी लावली. प्रास्ताविक दयानंद फडतरे यांनी केले. सूत्रसंचालन निवृत्ती फडतरे यांनी तर आभार नमन फडतरे यांनी मानले.
बुधवारी (ता. १६) पहाटे देवांना अभिषेक घालून महापूजा करण्यात आली. यावेळी दंडवत घालणे कार्यक्रम झाला. रात्री पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम रंगला. कुस्ती आखाड्यानंतर यात्रेची सांगता झाल्याची माहिती पोलिस पाटील विनायक गायकवाड यांनी दिली.