Kesari Chapter 2 Vicky Kaushal Role: अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे यांचा 'केसरी चॅप्टर २' हा चित्रपट १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच प्रेक्षकांना एक खास नाव दिसते ते म्हणजे छावा फेम विकी कौशल. हो, चित्रपटाच्या सुरुवातीला विशेष आभार म्हणून विकीचे नाव पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि विकीने या चित्रपटात काय काम केले आहे असा प्रश्न विचारत आहेत.
खरंतर, 'केसरी चॅप्टर २' हा जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित कोर्टरूम ड्रामा आहे. दिग्दर्शक करण सिंह त्यागी यांनी या वेदनादायक ऐतिहासिक घटनेचे अतिशय संवेदनशील पद्धतीने चित्रीकरण केले आहे. या चित्रपटाची कथा रघु पलट आणि पुष्पा पलट यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या 'द केस दॅट शूक द एम्पायर' या पुस्तकावर आधारित आहे.
विकी कौशलने साकारली महत्त्वाची भूमिका
चित्रपटात दिसत नसला तरी त्याचा आवाज चित्रपटाचा आत्मा बनला आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी विकीच्या आवाजात ऐकून प्रेक्षकांचे अंगावर काटा येतो. चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात, जेव्हा ब्रिटीश जनरल डायर त्याच्या सैनिकांसह नि:शस्त्र लोकांवर गोळीबार करतो, तेव्हा विकीच्या आवाजात ते दृश्य आणखी प्रभावी होतात. त्याचा आवाज प्रेक्षकांना त्या वेदनादायक घटनेच्या जवळ घेऊन जातो.
चित्रपटाचे कौतुक होत आहे
चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत '' प्रेक्षकांच्या भावनांना हेलावून टाकतो. पहिल्या १० मिनिटांमधील कोरिओग्राफी आणि हत्याकांडाचे दृश्ये हृदयद्रावक आहेत. चित्रपटाचे खरे नाट्य कोर्टरूममध्ये उलगडते, जिथे भारत विरुद्ध ब्रिटिश सरकार यावर वादविवाद होतो. आर. माधवन आणि अक्षय कुमारचा दमदार अभिनय आणि अनन्या पांडेची भावनिक बाजू देखील लोकांना आवडू लागली आहे.