Urfi Javed : बम बम भोले! उर्फी जावेद पोहचली बाबुलनाथ मंदिरात; गुडघे टेकवत चढली पायऱ्या, पाहा VIDEO
Saam TV May 06, 2025 04:45 PM

उर्फी जावेद (Urfi Javed ) कायम आपल्या हटके स्टाइलसाठी ओळखली जाते. ती कायम आपल्या वेगवेगळ्या अतरंगी लूकमध्ये स्पॉट होते. उर्फी जावेद एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री आहे. ती कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा उर्फी चर्चेत आली आहे. उर्फीने बाबुलनाथ मंदिराला (Babulnath Temple) भेट दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे तिने गुडघे टेकवत पायऱ्या चढत ती मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहचली आहे. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

urfi javed

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जीन्स आणि टॉपमध्ये मंदिरात पोहचली आहे. डोक्यावर काळ्या रंगाची ओढणी घेऊन आणि हात टेकवत पायऱ्या चढताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत आहे. तिची श्रद्धा डोळ्यात दिसत आहे. आपल्या स्टायलने चाहत्यांना वेड लावणारी उर्फी जावेद अध्यात्मक देखील तेवढीच आहे.

उर्फीने इन्स्टाग्राम स्टोरीला मंदिराच्या पायऱ्या चढतानाचा व्हिडीओ टाकला आहे. त्यावर उर्फीने लिहिलं की, "गुडघ्यावर बाबुलनाथ मंदिराच्या पायऱ्या चढले. फक्त ओढणी सांभाळताना त्रास झाला..." तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

उर्फी जावेदने आपल्या स्टाइलने टिव्ही आणि बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'बिग बॉस ओटीटी' देखील गाजवले आहे. उर्फीला 'फॉलो कर लो यार' या शोमुळे खूप लोकप्रियता मिळवून दिली. उर्फी जावेदच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. उर्फी जावेदने याआधी देखील Kambeshwar मंदिराला भेट दिली आहे. मंदिराच्या 400 पायऱ्या चढून तिने महादेवाचे दर्शन घेतले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.