मराठी सिनेसृष्टीत अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी प्रचंड प्रसिद्ध आहे. चाहत्यांना दोघांची जोडी फार आवडते. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी 1990 मध्ये लग्न केलं. दोघांच्या वयातील अंतर हे 18 वर्ष आहे. 1947 मध्ये अशोक सराफचा जन्म झाला तर 1965 मध्ये निवेदिता सराफ यांचा. दरम्यान अशोक सराफ यांनी त्यांच्या पहिला भेटीचा किस्सा शेअर केलाय.
'डार्लिंग डार्लिंग' या नाटकावेळी दोघांची पहिली भेट झाली. या नाटकात निवेदिता सराफ हिचे वडील सुद्धा काम करायचे. अशोक सराफ आणि निवेदिताचे वडील गजन जोशी चांगले मित्र होते. एका प्रयोगादरम्यान निवेदिता सराफ नाटकाच्या ठिकाणी आल्या.
अशोक सराफ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'निवेदिता तेव्हा वयानं छोटी, दिसायला लहान' असल्याचं सागंतिलं. तेव्हा निवेदिताच्या वडिलांनी 'ही माझी मुलगी. तुला भेटायला आलीय' अशी ओळख करुन दिली. तेव्हा ही बायको होईल असं कधीच त्यांना वाटलं नव्हतं. परंतु नंतर अशोक आणि निवेदिता यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 'नवरी मिळे नवऱ्याला' 'अशी ही बनवाबनवी' या सारख्या चित्रपटातून त्यांनी एकत्र काम केलं.
चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर त्यांच्यातील मैत्री वाढू लागली. मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. जेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. तेव्हा घरच्यांकडून विरोध झाला. पण निवेदिताची मोठी बहीण मीनल हिने कुटुंबियांकडून परवानगी मिळवली, आणि अशोक सराफ आणि निवेदिता यांनी लग्नगाठ बांधली. आता या दोघांना एक मुलगा असून त्याचं नाव अनिकेत आहे.