विराट कोहलीने टी20 वर्ल्डकप 2021 नंतर कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदालाही रामराम ठोकला. त्यानंतर एका वर्षानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर कसोटी कर्णधारपदही सोडलं. त्यानंतर कर्णधारपदाची माळ रोहित शर्माच्या गळ्यात पडली. पण विराट कोहलीने कर्णधारपद का सोडलं? याची चर्चा तेव्हा रंगली होती. पण खरं कारण कोणालाच माहिती नव्हतं. अखेर चार वर्षानंतर विराट कोहलीने खुलासा केला आहे. विराट कोहलीने सांगितलं की, ‘एक वेळ अशी आली की जेव्हा माझ्या कारकिर्दीत बरंच काही घडलं आणि माझ्यासाठी ते खूपच कठीण झालं. मी 7-8 वर्षे भारताचं नेतृत्व करत होते. मी 9 वर्षे आरसीबीचं नेतृत्व केलं. मी जे काही सामने खेळलो, त्यात माझ्याकडून फलंदाज म्हणून खूपच अपेक्षा होत्या.’
‘मला कळतंच नव्हतं की मी लक्ष केंद्रीत करण्यास संघर्ष करत आहे. कर्णधारपद भूषवताना तसं होत नव्हतं. पण फलंदाजी करताना तसं होत होतं. मी प्रत्येक वेळी त्याचाच विचार करायचो. ते माझ्यासाठी खूपच कठीण झालं होतं. अखेर या सर्व गोष्टींचा माझ्यावर खूपच दबाव वाढला होता.’ विराट कोहलीने 2022 मध्ये क्रिकेटमधून एक महिन्यांचा ब्रेक घेतला होता. तेव्हा त्याने बॅटला स्पर्शही केला नव्हता. तसेच सार्वजनिक जीवनात आनंदी राहण्यासाठी संघर्ष करत होता.
विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचं कारण सांगत म्हणाली की, ‘मी कर्णधारपद सोडलं कारण मला वाटले की जर मला खेळात राहायचे असेल तर माझ्यासाठी आनंदी राहणं महत्त्वाचं आहे.’ विराट कोहली पुढे म्हणाली की, ‘मला माझ्या आयुष्यात अशा ठिकाणी असण्याची गरज होती जिथे मी राहू शकेन, तसेच माझे क्रिकेट खेळू शकेन. कोणत्याही टीकेशिवाय. या पर्वात तु्म्ही काय करणार आहात आणि पुढे काय होणार आह हे न पाहता.’ विराट कोहली आयपीएल 2025 स्पर्धेत रजत पाटिदारच्या नेतृत्वात आरसीबी संघाकडून खेळत आहे. या पर्वात विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने 500 हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक 7 अर्धशतकं ठोकली आहेत.