RR vs LSG Live: रिषभचे अपयश, पण एडन मार्करम, आयुष बडोनी यांचे अर्धशतक; अब्दुल समदच्या ४ खणखणीत Six ने मॅच फिरली
esakal April 20, 2025 05:45 AM

Rajasthan Royals vs Marathi Update: खराब सुरुवातीनंतर लखनौ सुपर जायंट्सचा खेळ एडन मार्करम व आयुष बडोनी यांनी सावरला. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी इंडियन प्रीमिअऱ लीग २०२५ च्या आजच्या लढतीत चांगली पकड घेतली होती. पण, मार्करम व बडोनी यांनी सुरेख फटकेबाजी करून LSG ला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अब्दुल समदने शेवटच्या षटकात ४ षटकार खेचून राजस्थानसमोर तगडे आव्हान उभे केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनौला ५४ धावांवर तीन धक्के बसले. मिचेल मार्श तिसऱ्याच षटकात ४ धावांवर जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला. फॉर्मात असलेल्या निकोलस पूरनचा झेल टाकला गेला, परंतु त्याला जीवदानाचा फायदा उचलता आला नाही. संदीप शर्माच्या भन्नाट चेंडूवर तो ११ धावांवर पायचीत होऊन माघारी परतला. रिषभ पंतकडून आज अपेक्षा होत्या, पण तो ३ धावाच करू शकला. वनिंदू हसरंगाच्या गुगलीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्याने यष्टिरक्षक ध्रुव जुरेलला संधी दिली. जुरेलनेही अप्रतिम झेल घेतला.

एडन मार्करम ही पडझड पाहून खेळपट्टीवर उभा राहिला. त्याने यंदाच्या पर्वातील तिसरे अर्धशतकू पूर्ण करताना इम्पॅक्ट प्लेअर आयुष बडोनीसह चौथअया विकेटसाठी २६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. च्या गोलंदाजांची या दोघांनी डोकेदुखी वाढवली होती. १५ व्या षटकात या दोघांनी संघाला ३ बाद १२१ धावांपर्यंत पोहोचवले होते. १६व्या षटकात वनिंदूने LSG ची सेट जोडी तोडली. मार्करम ४५ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांवर बाद झाला आणि बडोनीसह त्याची ७६ ( ४९ चेंडू) धावांची भागीदारी तुटली.

वनिंदूने त्याच्या ४ षटकांत ३१ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. संदीप शर्माने संथ व आखूड चेंडूचा मारा केला, पण बडोनी चांगले फटके खेचत होता. त्याने ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तुषार देशपांडेच्या स्लोव्हर बाऊन्सरवर त्याने चांगला रिव्हर्स स्वीप मारला अन् यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चौकार मिळवला. पण, पुढच्याच चेंडूवर तुषारने त्याला माघारी पाठवले. बडोनी ३४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५० धावा केल्या.

RR च्या गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांत चांगला मारा केला. डेव्हिड मिलर व अब्दुल समद या आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांना त्यांनी तसे शांतच ठेवले होते. पण, समदने २०व्या षटकात ४ खणखणीत षटकार खेचले आणि लखनौला ५ बाद १८० धावांपर्यंतच पोहोचवले. समदने १० चेंडूंत नाबाद ३० धावा केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.