साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलीच चर्चेत असते. नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर तिचे नाव सध्या दिग्दर्शक राज निदिमोरुसोबत जोडले जात आहे. समांथा रुथ प्रभूने 2017ला नागा चैतन्यसोबत लग्नगाठ बांधली. ही दोघे 2021ला वेगळे झाले. त्यांनी घटस्फोट घेतला. आता समांथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरु दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत.
आता रुथ प्रभू आणि राज निदिमोरु (Raj Nidimoru)एकत्र स्पॉट झाले् आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नुकतेच समांथा रुथ प्रभूने तिरुपती मंदिराला भेट दिली आहे. तेव्हा तेथे समांथा आणि निदिमोरु एकत्र स्पॉट झाले आहेत. यापूर्वी देखील समांथा आणि राज अनेक वेळा एकत्र स्पॉट झाले होते. त्यांनी एकत्र तिरुपती मंदिरात दर्शन घेतले आहे.
मंदिरात समांथा रुथ प्रभूने गुलाबी रंगाचा सलवार सूट परिधान केला होता. तर राज निदिमोरुने निळ्या रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या लुंगी परिधान केली होती. समांथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरु यांच्या व्हिडीओने त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. कमेंट्समध्ये नेटकरी समांथाला ट्रोल करताना दिसत आहेत.
साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचे नाव राज निदिमोरुसोबत जोडले जात आहे. राज निदिमोरु हा एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. आजवर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट आणि वेब सीरिज केल्या आहेत. द फॅमिली मॅन, फर्जी आणि सिटाडेल हनी बनी या त्याच्या गाजलेल्या वेब सीरिज आहेत. 'सिटाडेल हनी बनी'समांथा रुथ प्रभूने बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत काम केले आहे.