पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते सीन पार्नेल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “या जाणीवपूर्वक आणि अटींवर आधारित प्रक्रियेमुळे येत्या काही महिन्यांत सीरियातील अमेरिकन सैनिकांची संख्या 1,000 पेक्षा कमी होईल.” संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी ऑपरेशन इंटीग्रेटेड रिझॉल्यूशन या संयुक्त टास्क फोर्सअंतर्गत सीरियातील निवडक ठिकाणी एकत्रीकरण करण्याचे निर्देश दिले.
अमेरिकेचे लष्कर येत्या आठवडय़ात आणि महिन्यांत सीरियातील आपली उपस्थिती कमी करणार आहे. यामुळे सीरियातील अमेरिकी सैनिकांची संख्या निम्म्याने कमी होऊ शकते. पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते सीन पार्नेल यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
अमेरिकेच्या लष्कराचे सीरियातील अनेक तळांवर सुमारे दोन हजार अमेरिकी सैनिक असून, त्यातील बहुतांश सैनिक ईशान्य भागात तैनात आहेत. इस्लामिक स्टेटचे पुनरुत्थान रोखण्यासाठी हे सैनिक स्थानिक सैन्यासोबत काम करत आहेत. इस्लामिक स्टेटने 2014 मध्ये इराक आणि सीरियाच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला होता, परंतु त्यानंतर तो मागे ढकलण्यात आला आहे.
अमेरिकेच्या संरक्षण खात्याने काय म्हटले?
पारनेल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “या जाणीवपूर्वक आणि अटींवर आधारित प्रक्रियेमुळे येत्या काही महिन्यांत सीरियातील अमेरिकन सैनिकांची संख्या 1,000 पेक्षा कमी होईल.” संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी ऑपरेशन इंटीग्रेटेड रिझॉल्यूशन या संयुक्त टास्क फोर्सअंतर्गत सीरियातील निवडक ठिकाणी एकत्रीकरण करण्याचे निर्देश दिले.
सीरियातील इसिसवर हल्ले सुरू ठेवण्यासाठी अमेरिकेची सेंट्रल कमांड सज्ज राहील आणि आयसिसवर दबाव कायम ठेवण्यासाठी आणि इतर कोणत्याही दहशतवादी धोक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आघाडीच्या भागीदारांसोबत काम करेल, असे पार्नेल यांनी सांगितले.
अमेरिकेने मध्य पूर्वेत तैनाती वाढवली
मध्यपूर्वेला बळकटी देण्यासाठी अमेरिकेने नुकतीच B-2 बॉम्बर्स, युद्धनौका आणि हवाई संरक्षण यंत्रणेसह विमाने पाठवली आहेत. इराण अमेरिकेबरोबरच्या अणुकराराला जाणीवपूर्वक उशीर करत असून अण्वस्त्रनिर्मितीचा प्रयत्न सोडून द्यावा किंवा तेहरानच्या आण्विक प्रकल्पांवरील संभाव्य लष्करी हल्ल्याला तोंड द्यावे, असे ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले.
तुर्कस्तानने सीरियात अमेरिकेशी विश्वासघात केला का?
डिसेंबरमध्ये बशर असद यांना सत्तेतून हटवल्यानंतर सीरियात इस्लामी प्रणित सरकार आहे. या सरकारला तुर्कस्तानचा पाठिंबा आहे. त्याचवेळी तुर्कस्तानला शत्रू मानणाऱ्या सीरियातील सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसला अमेरिका पाठिंबा देत आहे. अशा परिस्थितीत तुर्कस्तानने इस्लामी सरकारवर दबाव आणून अमेरिका समर्थित एसडीएफविरोधात लष्करी कारवाई तीव्र केली आहे. यामुळे सीरियात अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.