पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडाप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दुपारी ही सुनावणी होणार आहे. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी पनवेल जिल्हा न्यायालयात हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह दोन जणांना काय शिक्षा होणार याकडे लक्ष लागले आहे. अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे आणि मुलगी सिद्धीने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार हे शिक्षा सुनावणार आहेत.
Maharahstra LIVE: राज ठाकरेंच्या निवासस्थान शिवतीर्थबाहेर झळकले बॅनरशाळांमध्ये हिंदी सक्तीवरुन महाराष्ट्राचे राजकारण पेटलं आहे. मनसेनं हिंदी सक्तीला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेमध्ये राजकीय वॉर सुरु झाले आहे. राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थबाहेरही हे बॅनर लावण्यात आलेत. त्यामुळे या बॅनरच्या माध्यमातून भाजपनं मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनं हिंदी भाषेच्या समर्थनार्थ मुंबईच्या दादर परिसरात बॅनरबाजी केली. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर दादर परिसरात झळकलेत आहेत.
ग्रामपंचायतमध्येच बालविवाह लावण्याचा प्रयत्न, पोलिसांनी केली कारवाईबारामतीमध्ये माळेगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न केला गेला. ग्रामपंचयातीला या विषयी काहीच माहिती नव्हती. अल्पवयी मुलीच्या विवाहाची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत हा प्रयत्न हाणून पाडला. मुलीचे वय अवघे तेरा वर्ष असल्याचे समोर आले. ग्रामसेवक इम्तियाज इनामदार यांनी फिर्यादीनुसार मुलीचे वडील, आई, होणारे सासरे, ,सासू आणि नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला.
राज ठाकरेंचा जन्म शिवसेनेच्या गर्भातून - संजय राऊतराज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत सामनाच्या अग्रलेखातून मत मांडण्यात आले आहे. अमित शहा, मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे लोकांनी महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वार केले. याच शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बेइमानी करणाऱ्यांना पंगतीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी पुढे नेणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
निवडणुकीत प्रक्रियेत गंभीर समस्या, महाराष्ट्रात मतदान वाढीममागे घोळ - राहुल गांधीराहुल गांधी हे अमेरिकेच्या दौैऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यात भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंतचा मतदानाचा डेटा दिला. पण संध्याकाळी ५:३० ते ७:३० वाजेपर्यंत जेव्हा मतदान संपायला हवे होते तेव्हा ६५ लाख मतदारांनी मतदान केले. या संख्येमध्ये मोठा घोळ आहे. कारण येवढे मतदान झाले तर पहाटे तीन पर्यंत मतदान होणे अपेक्षित होते मात्र निवडणूक आयोग आम्हाला मतदानाचे व्हिडिओ देखील देत नाही.
शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्रपुण्यात एका बैठकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आज दोघेही एकत्र येणार आहेत. साखर संकुलातील तंत्रज्ञानाविषयी असलेल्या एका बैठकीसाठी हे दोनही नेते एकत्र येतील.
Ashish shelar On Raj Thackeray : वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला - आशिष शेलारवैयक्तिक मित्र होते. राज ठाकरेंशी हात मिळवणी करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषणात काही अटी ठेवल्या. मात्र, ती अट आहे की राजकीय कट आहे अशी शंका आहे. आता वैयक्तिक मित्र विषय संपला, असे देखील शेलार म्हणाले