आता नवे पोप कोण ? हे आहेत 5 चेहरे, ज्यापैकी 1 होणार जगातील सर्वात मोठा धर्मगुरु
GH News April 21, 2025 09:13 PM

८८ व्या वर्षी पोप फ्रान्सिस यांनी जगाचा निरोप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी श्वास घेता येत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या निधनानंतर आता जगातील सर्वात मोठा धर्म असलेल्या ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च पदाची खुर्ची रिकामी आहे. कशी होते पोपची निवड आणि कोण आहेत मोठे चेहरे ?  जे या सर्वोच्च धार्मिक पदाची जबाबदारी सांभाळू शकतील…

ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस निवर्तले आहेत. १४ फेब्रुवारीला रोमच्या जेमेलीतील एका रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. त्यानंतर डॉक्टरांना समजले की त्यांना डबल न्युमोनिया आहे. त्यामुळे त्यांना श्वास घेणे कठीण जात होते. त्यातून बरेही झाले होते. इस्टर सण्डेला सेंट पीटर्स चौकात ते लोकांसमोर आलेही होते आणि काल सकाळी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंन्स यांना देखील भेटले होते.

पोप फ्रान्सिस यांचा काळ

पोप फ्रान्सिस अनेक बाबातीत ऐतिहासिक ठरले. ते पहिले जेसुएट पोप होते, पहिले अमेरितून आलेले पोप होते, दक्षिण गोलार्धातुन आलेले पहिले पोप होते आणि एक हजार वर्षांनंतर झालेले पहिले गैर – युरोपीय पोप होते !  आता त्यांच्या निधनानंतर जगातील सर्वात मोठ्या धार्मिक जबाबदारीचा मुकूट आता कोणच्या शिरावर विराजमाने होणार याची उत्सुकता लागली आहे. पुढचा पोप होणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. सध्या हे सहा चेहरे चर्चेत आहेत….

नवीन पोपची निवड कशी जाणार ?

पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर अजूनपर्यंत नव्या पोप बद्दल घोषणा केलेली नाही. नव्या पोपची निवड एका खास प्रक्रियेद्वारा केली जाणार आहे. ज्यात पॅपल कॉन्क्लेव्ह असे म्हटले जाते.जेव्हा पोप यांचा मृत्यू होतो तेव्हा कॅथलिक चर्चचे कार्डिन्लस निवडूक करतात. कार्डिनल्स वरिष्ठ पादरियों फादर्स मंडळींचा एक ग्रुप आहे.यांचे काम सल्ला देण्याचे आहे. दरवेळी याच कार्डिन्लसपैकी पोपची निवड केली जाते. कार्डिन्लस हा एक वरिष्ठ पादरींचा एक गट आहे. यांचे काम असते पोपला मार्गदर्शन करणे. दरवेळी याच कार्डिन्लस पैकी एकाची निवड केली जाते. पोप बनण्यासाठी कार्डिन्लस असणे गरजेचे नाही. आता पर्यंत प्रत्येक निवडून आलेले पोप आधी कार्डीनल होते.

कोण होऊ शकतात नवीन पोप ? ही पाच नावे चर्चेत

व्हेटीकस सिटीत २५३ कार्डिनल आहेत. व्होटींगच्या अधिकारापासून ८० वर्षांहून अधिक वयाच्या धर्मगुरुंना वगळले आहे. केवळ १३८ कार्डिनलला मतदानाचा अधिकार आहे.

1. कार्डिनल पिएत्रो पारोलीन:

व्हेटीकन धर्म सत्ता संचरनेत एक मोठे नाव कार्डिनल पिएत्रो पारोलिन यांचे आहे.गेल्या एक दशकापासून पोप फ्रान्सिस यांचे सर्वात विश्वासार्ह सहकाऱ्यांपैकी एक असलेले पिएत्रो गृह सचिव ( सेक्रेटरी ऑफ स्टेट ) म्हणून साल २०१३ पासून मुत्सद्देगिरी आणि प्रशासकीय नेतृत्व करीत आहेत. त्यांचे वय देखील ७० आहे. ते इटलीच्या वेनेतो येथील आहेत. यंदा त्यांचे नाव सर्वात चर्चेत आहे. त्यांना २०१४ मध्ये कार्डिनलचे पद मिळाले.

2. कार्डिनल पीटर एर्डो:

कॅथलीक चर्चमध्ये पीटर एर्डो यांचे नाव रुढीवादी आणि परंपरागत विचारांसाठी ओळखले जात आहे. त्याचं वय ७२ वर्षे आहे. साल २००३ मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय यांनी त्यांना कार्डिनल बनवले होते. युरोपच्या बिशप सम्मेलन परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. कॅथलिक परंपरेचे खंदे समर्थक मानले जातात. घटस्फोटीत आणि पुनर्विवाह करणाऱ्या कॅथलिकांना Holy Foods चा अधिकार देऊ नये असे त्यांचे मत आहे.

3. कार्डिनल मातेओ झुप्पी:

कॅथलिक चर्चमध्ये सर्वात प्रगतीशील आणि प्रभावशाली चेहऱ्यांपैकी कार्डिनल मातेओ जुप्पी एक आहेत. पोप फ्रान्सिस यांचे सर्वात लाडक्या नेत्यांत त्यांची गणना होते. त्यांचे वय ६९ वर्षांचे होते. २०२२ पासून इटलीच्या एपिस्कोप कॉन्फरन्सचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना पोप फ्रान्सिस यांनी साल २०१९ मध्ये कार्डिनल म्हणून नियुक्त केले होते. केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरच नाही तर चर्चच्या अंतर्गत सर्वसमावेशकता आणि संवादाचे ते समर्थक म्हणून ओळखले जातात.

4. कार्डिनल रेमंड बर्क:

कॅथलिक चर्चच्या रुढीवाजी चेहऱ्यांपैकी एक असलेले कार्डिनल रेमंड बर्क यांचे वय ७० वर्षांचे आहे. २०१० मध्ये पोप बेनेडिक्ट XVI यांनी त्यांना कार्डिनल बनवले होते. त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्या सुधारणावादी धोरणांवर कठोर टीका केली होती. खास करुन घटस्फोटीत आणि पुनर्विवाह जोडप्यांना त्यांनी Holy Foods चा अधिकार देऊ नये असे म्हटले आहे..

5.कार्डिनल लुइस एंटोनियो टॅगले:

लुइस एंटोनियो यांचे वय ६७ आहे.ते जर पोप म्हणून निवडून आले तर पहिले आशियाई पोप बनू शकतील त्यांना साल २०१२ मध्ये पोप बेनेडिक्ट XVI यांनी कार्डिनल बनविले होते. यांचा चेहरा चर्चच्या सर्वात सुधारणावादी नेत्यांपैकी एक आहे. ते पोप फ्रान्सिस यांच्या धोरणे आणि विचारांचे जवळचे पाईक मानले जात आहेत. खासकरुन LGBTQ समुदाय, अविवाहित माता, घटस्फोटीत कॅथलिक यांच्या प्रश्नावर चर्चच्या कठोर आणि पक्षपाती धोरणांवर उघडपणे प्रश्न विचारले होते..

पुढचे पोप आफ्रीकीतील असू शकतात ?

या पाच चेहऱ्यांपैकी अनेक शतकांतून यंदा पहिल्यांदा आफ्रीका क्षेत्रातील कार्डिनल निवडला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. आतापर्यंत प्रमुख चेहऱ्या या चेहऱ्याची प्रतिनिधीत्व कमी मिळालेले आहे हे आहेत घाणा येथील पीटर टर्कसन, ते पोंटिफिकल काऊन्सिल फॉर जस्टीस एण्ड पीसचे अध्यक्ष देखील होते. तसेच दुसरे आहेत जकाँगोच्या फ्रीडोलिन अंबोंगो. अंबोंगो हे किन्शासाचे आर्चबिशप आहेत. दोन्हीही कट्टरपंथी परंपरावादी मानले जातात आणि आपआपल्या देशात शांततेचा पुरस्कार करणारे म्हणून ओळखले जातात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.