आयपीएल 2025 स्पर्धेच्या 39व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने लागला होता. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. गुजरात टायटन्सने जबरदस्त फलंदाजी केली आणि 3 गडी गमवून 20 षटकात 198 धावा केल्या. तसेच विजयासाठी 199 धावा दिल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव पत्त्यासारखा कोसळला. 20 षटकात 8 गडी गमवून फक्त 159 धावा करता आल्या. कोलकात्याचा 39 धावांनी पराभव झाला असून प्लेऑफची शर्यत चुरशीची झाली आहे. या विजयासाठी गुजरात टायटन्स गुणतालिकेत टॉपला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघ सातव्या स्थानावर कायम आहे. मात्र कोलकात्याचं प्लेऑफचं गणित किचकट झालं आहे. कारण नेट रनरेट खूपच खालावला आहे. त्यामुळे कोलकात्याला उर्वरित 6 सामन्यातील पाच सामन्यात काहीही विजय मिळवावा लागणार आहे.
अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘199 धावांचा पाठलाग करणे शक्य होते, आम्ही चेंडूने खेळात खूप चांगल्या प्रकारे परतलो. जेव्हा तुम्ही 199 धावांचा पाठलाग करत असता, तेव्हा तुम्हाला फलंदाजांकडून चांगली सुरुवात अपेक्षित असते, संपूर्ण स्पर्धेत तेच आहे. मला वाटले की या विकेटवर 199 धावांचा पाठलाग करणे शक्य होते. आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली, आम्ही फलंदाजीमध्ये अपयशी ठरलो. आम्हाला शक्य तितक्या लवकर शिकण्याची आणि पुढे जाण्याची आवश्यकता आहे. ते थोडे संथ खेळले, परंतु आम्हाला वाटले की जर आम्ही त्यांना 200 च्या खाली आणले तर बरं झालं असतं. आम्हाला या परिस्थितीची चांगली जाणीव आहे, आम्हाला योग्य फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे.’
गुजरात टायटन्सने विजयासाठी दिलेलं 198 धावांचं पाठलाग करताना कोलकात्याचे फलंदाज फेल गेले. कर्णधार अजिंक्य रहाणे वगळता एकही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही. अजिंक्य रहाणेने 36 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारून 50 धावा केल्या. पण वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर पुढे गेला आणि जोस बटलरने संधी हेरली आणि त्याला स्टम्पिंग केलं. मात्र त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी साजेशी कामगिरी केली नाही. त्यामुळे कोलकात्याचा 39 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर कोलकात्याचा नेट रनरेट घसरला आहे.