शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी, विदेशी गुंतवणूकदारांचं कमबॅक, गुंतवणूकदार मालामाल
Marathi April 22, 2025 05:25 AM

<एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी म्हणजेच सोमवारी (21 एप्रिल) तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये सकाळच्या सत्रात 1000 अंकांपेक्षा अधिक अंकांची वाढ झाल्याचं दिसून आलं. निफ्टी 50 नं देखील 24 हजारांचा टप्पा ओलांडला. सर्वच क्षेत्रामधील स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स 855.30 अंकांच्या तेजीसह 79408.50 अंकांपर्यंत पोहोचला. तर निफ्टी 50 निर्देशांक 273.90अंकांनी वाढून 24125.55 अंक  इथंपर्यंत पोहोचला. 

सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. यावरुन गुंतवणूकदारांच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 6 जानेवारीनंतर पहिल्यांदा या पातळीवर पोहोचले आहेत. मार्च 2025 ला संपलेल्या तिमाहीत मोठ्या बँकांची कामगिरी चांगली राहिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं या बँकांचा शेअरमध्ये तेजी दिसून आली. दुपारच्या सत्रात आयटी कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये देखील तेजी दिसून आली. 

विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून भारतीय शेअर बाजारात पुन्हा सुरु झालेली गुंतवणूक, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार यशस्वी होण्याची आशा असल्यानं शेअर बाजारातील तेजीला आधार मिळत आहे. याशिवाय रुपया देखील मजबूत झाला आहे. आज रुपया 33 पैशांनी मजबूत होऊन 85.05 रुपयांवर पोहोचला. 

बँकिंग शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. निफ्टी 50 निर्देशांकावर आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये अनुक्रमे 1.3 टक्के तर 0.9 टक्के तेजी आली. आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या चौथ्या तिमाहीचे आकडे जाहीर करण्यात आल्यानंतर यामध्ये तेजी आल्याचं पाहायला मिळालं. बँकांच्या शेअरमध्ये तेजी असल्यानं बँक निफ्टी निर्देशांक 55200 या नव्या उच्चांकापर्यंत पोहोचला होता. 

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर टेक महिंद्रानं सर्वात चांगली कामगिरी केली. या कंपनीच्या स्टॉकमध्ये 6.14 टक्के तेजी पाहायला मिळाली. इंडसइंड बँक 4.45 टक्के, बजाज फिनसर्व्ह 4.04 टक्के आणि एचसीएल टेक्नोलॉजीजच्या शेअरमध्ये 3.83 अंकांची तेजी पाहायला मिळाली. एक्सिस बँकेच्या शेअरमध्ये 3.81  तेजी दिसून आली. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांच्या बाजारमूल्यात 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. 

आयटी कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये देखील तेजी दिसून आली. निफ्टी आयटीमध्ये 3.25 टक्के तेजी दिसून आली. निफ्टी पीएसयू बँक  निर्देशांक 2.67 टक्के आणि निफ्टी प्रायव्हेट बँक 2.44 टक्के वाढ झाली.  निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 2.33 टक्के, निफ्टी स्मॉल कॅप 100 निर्देशांकात 1.96 टक्क्यांची वाढ झाली आहे.    

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.