इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ३९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सोमवारी होत आहे. कोलकाताच्या घरच्या मैदानात ईडन गार्डन्सवर हा सामना रंगणार आहे. गुजरात सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे, तर कोलकाताची कामगिरी संमिश्र झाली आहे.
त्यामुळे आता गुजरात फॉर्म राखणार की कोलकाता बाजी मारणार हे या सामन्यानंतर स्पष्ट होईल. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोलकाताने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले आहेत. त्यांनी मोईन अली आणि गुरबाजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. दरम्यान, रहाणेने नाणेफक जिंकल्यानंतर त्याचा निर्णय सांगितल्यानंतर प्रेझेंटेटर डॅनी मॉरिसन गुजरातचा कर्णधार बोलत होते.
यावेळी गिलने दव पडेल असं वाटत नसल्याचे सांगितले, तसेच राशीद खान संघात ऊर्जा आणतो, असंही म्हणाला. यानंतर अचानक मॉरिसन यांनी त्याला म्हटले की छान दिसतोय, लग्नाचा काही भविष्यात विचार आहे का? त्यावर हसून गिल म्हणाला, नाही तसं काही नाही.
गुजरात टायटन्स: साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रुदरफोर्ड, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज
कोलकाता नाईट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्यायगुजरात टायटन्सचे इम्पॅक्ट सब्स्टिट्युट पर्याय - इशांत शर्मा, महिपाल लोमरोर, अनुज रावत, करीम जनात, अर्शद खान
कोलकाता नाइट रायडर्सचे इम्पॅक्ट सब्स्टिट्युट पर्याय - मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, लुवनीथ सिसोदिया, अनुकुल रॉय
कोलकाता नाईट रायडर्सला गेल्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध ११२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नव्हता. त्यामुळे हा मानहानिकारक पराभव विसरून त्यांना पुढे जावे लागणार आहे. कोलकाताने ७ पैकी ३ सामने जिंकले आहेत, तर ४ सामने पराभूत झाले आहेत.
दुसरीकडे सध्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर गुजरात टायटन्स आहेत. त्यांनी ७ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे, तर २ सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आता हे दोन संघ आपला ८ वा सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स हे संघ ४ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील २ सामने गुजरातने आणि १ सामना कोलकाता नाईट रायडर्सने जिंकला आहे. आयपीएल २०२५ मध्ये पहिल्यांदाच हे दोन संघ आमने - सामने येत आहेत. गेल्यावर्षी या दोन संघातील सामना पावसामुळे रद्द झाला होता.