शेअर बाजारातील तेजीला ब्रेक लागणार? ब्रोकरेज फर्मनं गुंतवणूकदारांची धाकधूक वाढवली
Marathi April 21, 2025 10:25 PM

<एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई : भारतीय शेअर बाजारात स्थिरता दिसत असून सलग पाच दिवस तेजी दिसून येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर शुल्क आकारणीला दिलेली स्थगिती याचा परिणाम देखील शेअर बाजारावर दिसून आला आहे. दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदारांकडून देखील भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवत शेअर खरेदी करण्यात आल्यानं तेजी दिसून आली. भारतीय शेअर बाजारात तेजीचं वातावरण दिसत असलं तरी आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म नोमुरानं आगामी कालावधीसाठी चिंता व्यक्त केली आहे. मार्च 2026 पर्यंत निफ्टी 50  निर्देशांक 24970  अंकांवर पोहोचेल असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजे सध्या निफ्टी 50 निर्देशांक ज्या स्थितीत आहे त्यामध्ये  केवळ 3 टक्क्यांची वाढ होऊ शकते. 

नोमुरा फर्मनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लादलं जाणारं टॅरिफ, भारतीय कंपन्यांच्या कमाईमधील घसरणीचा अंदाज आणि जागतिक मंदीमुळं  निफ्टी 50 निर्देशांकाच्या वाढीसंदर्भातील अंदाज घटवला आहे. सध्या भारतीय बाजारातील जोखीम कमी होत आहे. विदेशी गुंतवणूकदारांकडून पुन्हा खरेदी होईल, अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी गेल्या सहा महिन्यात विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेण्यात आले आहेत. 

नोमुरानं त्यांच्या रिपोर्टनुसार 18.5x च्या जुन्या मुल्यांकनाच्या गुणांकाला वाढवून 19.5x केला आहे. बाँड यील्ड मधील घसरण लक्षात घेण्यात आली आहे. याशिवाय देशांतर्गत सेक्टर, ग्राहक आणि वित्तीय कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यावेळी आयटी, मेटल्स , ऑटो आणि फार्मा या सारख्या निर्यातीच्या क्षेत्रातील विभाग पिछाडीवर आहेत. 

नोमुराच्या अंदाजानुसार भारताला अमेरिकेसोबतच्या संभाव्य व्यापारी करारामुळं फायदा होऊ शकतो. याशिवाय पुरवठा साखळीच्या ठिकाण बदलाचा फायदा भारताला होण्याची स्थिती आहे. याशिवाय भारताची अर्थव्यवस्था सध्या स्थिर आहे. भारताला घसरणाऱ्या  कच्चा तेलाचा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, नोमुराच्या अंदाजानुसार अमेरिका भारतासोबत सहजपणे व्यापारी करार करणार नाही. टॅरिफ घटवण्यासह इतर गोष्टींमध्ये देखील सूट मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असेल. त्यामुळं व्यापारी कराराला दिरंगाई होईल. यामुळं टॅरिफ कमी झालं तरी ते उच्चांकी स्तरावर असल्यास बाजारात अनिश्चितता दिसत आहे.  

जीडीपी 5.8 टक्के राहण्याचा अंदाज

नोमुरानं सध्या कंपन्यांच्या कमाईतील घसरणीचा अंदाज देखील जोखीम आहे, असं म्हटलंय. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा  जीडीपी विकास दर 5.8 टक्के राहील असा अंदाज आहे. जो सध्याच्या अपेक्षांपेक्षा कमी आहेया स्थितीत कंपन्यांच्या कमाईचा वेग देखील वेगवान राहणार नाही,असा अंदाज वर्तवला आहे. 

अखेर नोमुरानं म्हटलं की नजीकच्या भविष्यात इक्विटी मूल्यांकनाचा बाँड यील्डसच्या घसरणीत पाठिंबा मिळू शकतो. नोमुराच्या मते जागतिक इक्विटी मार्केटमध्ये दुरुस्ती पाहायला मिळाली आहे. 
 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.