सुरज चव्हाण याला बिग बॉसच्या घरातून एक वेगळी ओळख मिळाली. बिग बॉसच्या घरात सुरजचं सर्वांसोबत एक वेगळं नातं निर्माण झालं. प्रत्येकासोबत त्याची एक वेगळी बॉन्डिंग निर्माण झाली होती. दरम्यान सुरज चव्हाण सध्या त्याच्या अगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच तो बिग बॉसच्या घरातील मित्रमैत्रिणीच्या भेटी सुद्धा घेत आहे. दरम्यान नुकतच त्याने बिग बॉसच्या घरातील त्याची लाडकी चिऊताई म्हणजेच योगिता चव्हाण हिची भेट घेतली आहे. यावेळी दोघांनी 'झापूक झुपूक' गाण्यावर भन्नाट डान्स केलाय.
सुरज चव्हाण आणि योगिता चव्हाण यांचं बिग बॉसच्या घरात एक वेगळं नातं होतं. दोघांमध्येही खास मैत्री झाली होती. दरम्यान सध्या सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरातील मित्रांच्या घरी जाऊन भेटी-गाठी घेत आहे. नुकताच त्याने योगित चव्हाण हिच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. यावेळी दोघांनीही झापूक झुपूक आणि पोरांचा बाजार उठला र गाण्यावर भन्नाट डान्स केला.
सुरजने योगितासोबतच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट देखील केला आहे. त्याच्या व्हिडिओला नेटकऱ्यांच्या कमेंट्स सुद्धा येत आहे. चाहत्यांना दोघांच्या नृत्याचा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. दोघांनी सुद्धा गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
योगिता चव्हाणने सुद्धा सुरजच्या चित्रपटाला शुभेच्छा देत सर्वांना चित्रपट पहाण्याचं आवाहन केलं आहे. येत्या 25 एप्रिलला सुरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सुरज चव्हाण मुख्य भूमिकेत असून अनेक मोठे कलाकार चित्रपटात पहायला मिळणार आहेत.