पुणे - कात्रज येथील जमिनीच्या वादातून हत्या करून पसार झालेल्या चार आरोपींना आंबेगाव पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून २४ तासाच्या आत बेड्या ठोकल्या.
२० एप्रिल रोजी पहाटे कात्रज येथील साईछत्र अपार्टमेंटच्या पाठीमागील जागी एका तरुणाची हत्या झाली होती. याबाबत आंबेगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी निष्पन्न करत आरोपी सोलापुरातील मोहोळ येथील कामती खुर्द येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलिस अंमलदार हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, नितीन कातुर्डे असे मोहोळ येथे जाऊन त्यांना अटक केली.
या प्रकरणात पोलिसांनी अमर दिलीप साकोरे, वय ४०, गिरीश सुभाष बाबरे (वय-२६), दोघेही रा. संतोषनगर, कात्रज, मंदार मारुती किवळे (वय-३५), रा. नवीन वसाहत, कात्रज, व योगेश बाबूराव डोरे (वय-३५), रा. खोपडेनगर, कात्रज यांना अटक केली.
ही कारवाई पोलिस उपआयुक्त परिमंडळ-२ च्या स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाचे सहा. पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती देवधर, भोजलींग दोडमीसे, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर आदींनी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक स्वाती देवधर या करत आहेत.