Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एकूण 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
अतिरेक्यांनी लोकांची नावे विचारून लोकांवर हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात मृतांचा आकडा 27 वर पोहोचला आहे. घटनास्थळी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आले आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर हा हल्ला झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुजरात, तमिळनाडू, उडिसा, महाराष्ट्र या राज्यातील पर्यटकांवर हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी काही पर्यटकांवर त्यांची नावं विचारून हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एक पर्यटक गंभीर जखमी आहे. तर इतर तीन पर्यटक जखमी आहेत. या सर्वांवर रुग्णालया उपचार केले जात आहेत.
हा भ्याड हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे अमित शाहांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केल करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.