सोलापूर : जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातून मनाला चटका लावून जाणारी बातमी समोर येत आहे. एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेने आठ दिवसांवर प्रसुती आलेली स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. नऊ महिन्यांच्या गरोदर मातेने फेट्याच्या सहाय्याने घरातील लोखंडी पत्र्याच्या अँगलला गळफास घेतला. रुक्मिणी सुरज टकले असे मृत गरोदर मातेचे नाव असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परंतु गरोदर मातेच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pregnant woman Rukmini Takle commits suicide 8 days after delivery)
गरोदर रुक्मिणी हिचा 17 मार्च 2024 रोजी सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथील सुरज टकले याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही महिन्यातच रुक्मिणी गर्भवती राहिली आणि तिची याच महिन्यात प्रसुती होणार होती. डॉक्टरांनी येत्या 29 एप्रिल रोजी प्रसुतीची तारीख दिली होती. मात्र प्रस्तुतीला फक्त 8 दिवस बाकी असताना रुक्मिणीने सोमवारी (21 एप्रिल) दुपारी 3 च्या सुमारास आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येची माहिती समोर येताच गायगव्हाण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – Hindi Language Controversy : सरकारकडून अनिवार्य शब्दाला स्थगिती; हिंदी सक्तीच्या निर्णयावर काय म्हणाले भुसे?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी रुक्मिणी ही बेडरुममध्ये होती. टकले कुटुंबियांनी जेवणासाठी बोलवण्यासाठी रुक्मिणीला आवाज दिला. मात्र रुक्मिणीने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे टकले कुटुंबीयांनी बेडरुमचा दरवाजा ठोठावला. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही रुक्मिणीने दार उघडला नाही. त्यामुळे रक्मिणीचा दीर स्वप्नील याने खिडकीची काच फोडून बेडरुमच्या आत पाहण्याचा प्रयत्न केला आणि रुक्मिणीने गळफास घेतल्याचे त्याला दिसून आले. गळफास घेण्यापूर्वी रुक्मिणीने ‘मला माफ करा, माझ्यात कोणताच चांगला गुण नाही’, असे चिठ्ठीत लिहून ठेवले होते. त्यामुळे रुक्मिणीने नक्की कोणत्या कारणाने आत्महत्या केली. याची माहिती अद्याप येऊ शकलेली नाही.
दरम्यान, मृत महिलेचा पती सुरज सीताराम टकले याने पोलिसांत आपल्या पत्नीच्या आत्महत्येची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तसेच सांगोला ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा मृत रुक्मिणीचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला.
हेही वाचा – Ashish Shelar : उद्धव ठाकरे मुंबईतील लँड स्कॅमचे बादशाह, पालिकेत सत्ता असताना…; शेलारांचे खळबळजनक आरोप