पुणे, ता. २२ : ‘जोयआलुक्कास’तर्फे अक्षय तृतीयेनिमित्त ग्राहकांसाठी ‘सुवर्ण समृद्धी योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत १९ एप्रिल ते एक मे या कालावधीत दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत.
या काळात ग्राहकांना ७५ हजार आणि त्याहून अधिक किमतीच्या हिरे, अनकट हिरे आणि प्लॅटिनम दागिने खरेदीवर ५००मिलिग्रॅम सोन्याचा बार मोफत मिळणार आहे. दीड लाख आणि त्याहून अधिक किमतीच्या दागिने खरेदीवर एक ग्रॅम सोन्याचा बार किंवा लक्ष्मीची मूर्ती मोफत मिळणार आहे. तर ३० एप्रिल २०२५ रोजी खरेदी करणाऱ्यांसाठी ७५ हजार आणि त्यावरील सोन्याच्या दागिन्यांवर २०० मिलिग्रॅम सोन्याचे नाणे मोफत मिळणार आहे. १० हजार आणि त्याहून अधिक किमतीच्या चांदीच्या दागिन्यांवर ५ ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळणार आहे.
जोयआलुक्कास ग्रुपचे अध्यक्ष जोय आलुक्कास म्हणाले, ‘‘सुवर्ण समृद्धी योजनेद्वारे अक्षय्य तृतीया साजरी करताना आम्हाला आनंद होत आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा शुभ मुहूर्त आहे. एखादा सुंदर दागिना खरेदी करायचा असो किंवा भेट द्यायची असो, गुणवत्ता, आकर्षकता आणि परंपरेत दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.’’