गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन अभिषेक पुजा केली.
दरम्यान तुळजाभवानी माता ही आमची कुलस्वामिनी असुन गेली अनेक वर्षापासून मी येत असतो, दरम्यान महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी जी मला संधी मिळाली आहे
ती सेवा करताना तुळजाभवानी मातेने मला शक्ती व बळ द्यावे अशी प्रार्थना केल्याचे कदम यांनी सांगितले यावेळी मंदीर संस्थानचे वतीने योगेश कदम यांचा तुळजाभवानी मातेचे प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
Operation Sindoor: भारताचे माजी लष्कर प्रमुख यांचे सूचक ट्विटभारत आणखी एक ऑपरेशन राबवणार?
ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय लष्कर दलाचे आणखी एक ऑपरेशन?
भारताचे माजी लष्कर प्रमुख यांचे सूचक ट्विट
"Abhi picture baki hai…" भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचे ट्विट?
लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे भारतीय लष्कराचे २८ वे प्रमुख होते
३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला होता
त्यापूर्वी नरवणे यांच्याकडे पूर्व मुख्यालयाची जबाबदारी होती
भारताने मध्यरात्रीनंतर पाकव्याप्त भागातील दहशतवाद्यांचे तळ जोरदार हल्ले करून उद्ध्वस्त केले.
यातं 75 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे बोलल्या जातंय.. पहलगाम हल्ल्याचा बदला घेत तब्बल नऊ ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आलेय..
दहशतवाद्यांवर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर आता देशभरात जल्लोष साजरा होत आहे.. अकोल्यातही अकोलेकरांनी जल्लोष केलाय..
अकोल्यातल्या अग्रेसन चौकात चौकातील विश्व हिंदू परिषद आणि अकोलेकरांनी फटाके फोडत जल्लोष केला आहे..
आणि भारताने केलेल्या हल्ल्याचा गर्व असल्याचे अकोलेकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या..
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकजम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सीमा/नियंत्रण रेषेवरील सुरक्षा आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. मुख्यमंत्री कार्यालय म्हणतात, "नागरिकांचे जीवन सुरक्षित करणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि कोणत्याही उदयोन्मुख आव्हानांना त्वरित प्रतिसाद देणे सुनिश्चित करणे यावर भर देण्यात आला आहे."
Air Strike च्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, "मी पंतप्रधान मोदी आणि आपल्या सशस्त्र दलांचे आभार मानतो ज्यांनी उत्तम काम केले आहे... त्यांनी दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला योग्य उत्तर दिले आहे. पण मला वाटते की हा एक ट्रेलर आहे आणि चित्रपट अजून येणे बाकी आहे. मी याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानतो, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन सिंदूर झाले आहे आणि ज्या माता आणि बहिणींचे "सिंदूर" हिसकावून घेण्यात आले होते त्यांचा बदला घेतला आहे... जगभरातील देश त्याचे समर्थन करत आहेत... ही फक्त सुरुवात आहे. पाकिस्तान भारतासमोर कुठेही टिकत नाही आणि जर त्याने काही केले तर आपले सशस्त्र दल जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला मिटवून टाकतील."
वादळी वाऱ्यामुळे पालघरच्या ग्रामीण भागातील अनेक घरांच नुकसान.
तर भात शेती आणि वीट उत्पादक व्यावसायिकांना देखील पावसाचा मोठा फटका.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस सुरू. तर पूर्व भागात पावसाची रिपरिप कायम.
Buldhana: भारताने केलेल्या एअर स्ट्राईकचं स्वागत करत अभिमानाने बुलढाण्यात नागरिक मोठा जल्लोषपहेलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हेअर स्ट्राइक करून पैलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांचा बदला घेतल्याची भावना व्यक्त करत बुलढाण्यातील नागरिक रस्त्यावर उतरले असून या ठिकाणी पहेलगाम हल्ल्यातील मृत्युमुखी नागरिकांना प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राइक च स्वागत करत अभिमानाने बुलढाण्यात नागरिक मोठा जल्लोष केल्या जात आहे...
Operation Sindoor: राजस्थानमधील स्थानिकांमध्ये 'हिंदुस्तान झिंदाबाद' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणाराजस्थानमधील स्थानिकांनी 'हिंदुस्तान झिंदाबाद' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा दिल्या आणि आनंद साजरा केला.
सकाळी १० वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे नियोजन
पुणे जिल्ह्यात आज तीन ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे
पुणे विधानभवन, मुळशी पंचायत समिती आणि तळेगाव नगर परिषद या ठिकाणी होणार ड्रिल
पोलिस, अग्निशमन दल, एन डी आर एफ, सैन्य दल या यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार
Eknath Shinde: ऑपरेशन सिंदूरबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रियामहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, "ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केल्या जाणाऱ्या कारवाईचे मी स्वागत करतो. त्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप लोकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर मारण्यात आले... न्याय मिळाला आहे. मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो आणि ते पाकिस्तानला सोडणार नाहीत."
पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर नागपूरमधील लोकांनी देशाचे कौतुक केले.
Akola Unseasonal Rain: अकोल्यात काल सायंकाळी आणि रात्री अवकाळी पावसासह गारपिटअकोल्यात काल सायंकाळी आणि रात्री अवकाळी पावसासह गारपिट झालीय.. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बाळापूर, अकोला, आणि काहीशी पातूर तालुक्याला अवकाळीने झोडपून काढलंय.. जोराच्या वादळी वारासह विजेचा कडकडाट देखील सुरु होता..
अकोल्यातल्या तेल्हारा आणि बाळापूर तालुक्यात गारपिट झाली आहे.. बाळापुर तालुक्यात निंबू, आंबा, कापणी करून ठेवलेला कांदासह अन्य फळबागांचं मोठं नुकसान झाले आहे..
दरम्यान, वादळी वाऱ्यामूळ अनेक ठिकाणी मोठमोठे झाड अक्षरशः उन्मळून पडले आहे.. अनेक गावांमध्ये काल रात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित आहे.
Supriya Sule: जय हिंद, खासदार सुप्रिया सुळे यांनी केले सोशल मिडिया पोस्टजय हिंद, खासदार सुप्रिया सुळे यांनी केले सोशल मिडिया पोस्ट
ऑपरेशन सिंदूर नंतर विरोधकांकडून देखील कौतुक
जय हिंद, आम्ही भारतीय जवानांसोबत उभे आहोत अशा आशयाची सुप्रिया सुळे यांची पोस्ट
भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर डोंबिवलीकरांनी समाधान व्यक्त केले तर विद्यार्थ्यांनी देखील बद्दल भारतात सरकारचे अभिनंदन केलं..
एअर स्ट्राईकच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचा विद्यार्थ्यांनी सांगितलं दहशतवाद्यांच्या क्रूर हल्ल्याचे हेच प्रत्युत्तर असल्याचे देखील विद्यार्थ्यांनी सांगितलं
भारताने अशाच कठोर कारवाया करून दहशतवादाच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत असला पाहिजेत अशी देखील मागणी या विद्यार्थ्यांनी केली
भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याबद्दल उल्हासनगर मधील नागरिकांच्या प्रतिक्रियापहलगाव मध्ये दहशतवाद्यांनी 28 निरापराध भारतीयांना मारल्यानंतर, आज पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी ठिकाणी भारताने क्षेपणास्त्र हल्ला करून दहशतवादी ठिकाणांना नष्ट केलं याबद्दल भारतात जल्लोष व्यक्त केला जात आहे तसेच येथील नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत,
Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात औस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला, त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया म्हणाले...पुण्यात, त्यांच्या पत्नी संगीता गणबोटे म्हणाले, "लष्कराने केलेली कारवाई चांगली आहे आणि त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देऊन त्यांनी महिलांचा आदर केला आहे.
मी अजूनही काही दिवस रडते.
आम्ही पंतप्रधान मोदी अशी कारवाई करतील याची वाट पाहत होतो आणि त्यांनी त्यांना योग्य उत्तर दिले आहे.
दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे..."
Operation Sindoor: केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज दिल्लीत होणार'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये एअर स्ट्राईक केला.
या कारवाईनंतर दिल्लीत महत्त्वाच्या दोन बैठकांचा कार्यक्रम ठरला आहे.
सकाळी ११ वाजता कॅबिनेट सुरक्षा समितीची आणि नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत.
Raigad Unseasonal Rain: रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरीरायगड जिल्ह्याच्या बहुतांश भागात रात्री उशिरा अवकाळी पावसाने हजेरी लावली.
दक्षिण रायगडच्या माणगाव, गोरेगाव, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर तालुक्यात मध्यम तर अलिबाग, पेण, मुरूड, खोपोली भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी जोरदार वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.
अखेरच्या टप्प्यातील आंबा पिकाचं या पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे. काल सकाळ पासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.
दरम्यान पुढील 24 तासात जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी अनेक ठिकाणाचे विद्युत पोल पडले, रात्री शहापूर तालुक्यातील विज पुरवठा खंडितरात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील लोकांची तारांबळ उडाली विजेच्या गडगडाट सह वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने तालुक्यातील अनेक भागातील विद्युत पोल पडल्याने शहापूर तालुक्यातील विजपुरवठा खंडीत झाला आहे. तर उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात झाडे रस्त्यावर पडली तर झाडे वाहनांवर पडल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
Yavatmal: पंचायतराज अभियान्यातून 16 पंचायत समित्या बादयवतमाळ जिल्ह्याची मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि तालुकास्तरावरील 16 समित्या ग्राम विभागाच्या यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियानात फेल ठरल्या असून जिल्हा परिषदेसह 16 पैकी एकाही पंचायत समितीला प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करता आला नाही, त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेची कामगिरी चर्चेत आली आहे.
Dhule: आग्रा रोड परिसरामध्ये रात्री तीन ते चार दुकानांना अचानक लागली आगधुळे शहरातील आग्रा रोड परिसरामध्ये रात्री तीन ते चार दुकानांना अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे,
यामध्ये प्रामुख्याने बॅगच्या दुकानाला शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,
आणि या दुकानात लागलेल्या आगिने रौद्ररूप धारण केल्यामुळे बाजूच्या तीन ते चार दुकानांना देखील या आगीने आपल्या लपेट्यात घेतले आहे, यामध्ये दुकानातील मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले असल्यामुळे लाखोंचे नुकसान या आगीच्या घटनेमध्ये झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, अग्निशमन विभागाच्या जवानांनी अथक प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे,
Opration Sindoor: भारताने रात्री दीड वाजता केला एअर स्ट्राईकपहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला होता.
या हल्ल्याच्या १५ दिवसांत भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.
६ आणि ७ मेच्या रात्री, पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर टार्गेट केलेली कारवाई करण्यात आली, जिथे दहशतवादी लपून बसले होते.