सायली शिंदे - योगतज्ज्ञ
पोटावरील चरबी ही अनेक स्त्रियांची सर्वसामान्य तक्रार आहे. गर्भधारणा, हार्मोनल बदल, तणावपूर्ण जीवनशैली, आणि बैठं काम यामुळे पोटाभोवती चरबी साचते. यामुळे सौंदर्यावर परिणामाबरोबरच अनेकदा पचनाच्या तक्रारी, थकवा, आणि आत्मविश्वासात घटही जाणवते. योग्य योगासनं, संतुलित आहार, नियमित दिनचर्येमुळे यावर नियंत्रण मिळवता येतं.
नौकासन : जमिनीवर बसून दोन्ही पाय सरळ पुढे, मग हळूच वर उचलून ‘V’ आकार तयार करा. हात सरळ समोर. श्वास सोडत पाय हळूहळू खाली आणा आणि शरीर सैल सोडा. फायदे : पोटावरील स्नायूंना ताण मिळतो, चयापचय वाढतं.
भुजंगासन : पोटावर झोपून, हातांनी आधार घेत शरीराचा पुढचा भाग वर उचलावा. श्वास घेत वर आणि श्वास सोडत परत खाली. फायदे : पोटावरचा ताण कमी होतो, पाठीचा कणा लवचिक होतो.
कपालभाती प्राणायामफायदे : पचनक्रिया सुधारते, पोटातील चरबी कमी होते, मानसिक ताजेपणा येतो.रोज ५ मिनिटे नियमित केल्यास फरक जाणवतो.
आहार
सकाळी उठल्यावर : कोमट पाणी + लिंबू + मध (रिकाम्या पोटी). नंतर भिजवलेले बदाम / अंजीर
नाश्ता (८–९ वाजता) : ओट्स पोहा / मूग डाळीची खिचडी. एक मध्यम फळ. ग्रीन टी / जिरे-मेथी पाणी
दुपारचे जेवण : २ ज्वारी/ नाचणीच्या भाकऱ्या, एक वाटी भाज्या+ आमटी + सूप + कोशिंबीर. ताक/ (मसाले नसलेली) कढी
संध्याकाळी : मूग अंकुर + लिंबू. साखरमुक्त ज्यूस (गाजर, बीटरूट, टोमॅटो).
रात्रीचे जेवण : उकडलेली भाजी + सूप ( भरपूर फालभाज्या घालून). शक्य असल्यास सॅलडवर भर द्या
दिनचर्यासातत्य आणि सुसंवाद यांवर भर
सकाळी लवकर उठणं
योगासनं, प्राणायाम यासाठी कमीत कमी ३०–४५ मिनिटं
८ ते १० हजार पावलं चालणं
मोबाईल, टीव्ही यापासून रात्री झोपण्याआधी विश्रांती
रात्री १०:३० पर्यंत झोप
२१ दिवसांची सवय
वजन कमी करणं हा एक दिवसाचा प्रकल्प नसून, शिस्तबद्ध सवयींचा प्रवास असतो. या संदर्भात मी महिलांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असून, २१ दिवसांची शिस्तबद्ध आहार आणि योग पद्धती वापरून सकारात्मक बदल घडताना पाहिले आहेत. या २१ दिवसांच्या कालावधीत विशेष योगासनं, हलका; पण पोषक आहार, आणि मानसिक स्थैर्य यांचा समतोल ठेवला जातो. त्यामुळे केवळ पोटाची चरबी नाही, तर थकवा, नैराश्य, आणि झोपेच्या समस्या यावरही परिणाम होतो. अनेक स्त्रिया या मार्गदर्शनानंतर स्वतःत फरक अनुभवतात – तोच खरा बदल असतो.
दररोज फक्त ३० मिनिटं स्वतःसाठी दिली, तरी शरीर आणि मन यात मोठा बदल घडतो. स्त्रियांनी स्वतःवर प्रेम करावं, कारण तिचं आरोग्य म्हणजे संपूर्ण घराचं स्वास्थ्य.