भारताचा स्टार क्रिकेटपटू कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
भारताला इंग्लंड दौऱ्यात २० जून २०२५ पासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी रोहितने कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली.
रोहितने कसोटीतून निवृत्तीची घोषणा करताना इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या कसोटी कॅपचा फोटो शेअर केला आहे.
रोहितने या पोस्टमध्ये लिहिले, 'मी कसोटीतून निवृत्त होत आहे. कसोटीत माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, हा मोठा सन्मान आहे. सर्वांना इतक्या वर्षांच्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद. मी भारताचे वनडेमध्ये प्रतिनिधित्व करणे कायम करणार आहे.'
रोहितच्या कसोटी निवृत्तीवर त्याची पत्नी रितिकाचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
तिने रोहितने पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीचा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला शेअर करत हार्टब्रेकचे इमोजी शेअर केले आहेत.
रोहित शर्माने ६७ कसोटी सामन्यांमध्ये १२ शतके आणि १८ अर्धशतकांसह ४३०१ धावा केल्या. त्याने २४ कसोटींमध्ये भारताचे नेतृत्वही केले.