पाकिस्तानला मोठा झटका, सैन्याच्या 39 तळांवर हल्ले, पाक बेसावध असताना काय घडलं?
GH News May 11, 2025 10:06 PM

BLA Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याने आता युद्धाचे ढग दूर झाले आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले न करण्याचा करार केला आहे. दरम्यान, या करारामुळे पाकिस्तानने सुटकेचा निश्वास सोडला आहे. पाकिस्तानची आता एक चिंता मिटली असली तरी दुसऱ्या बाजूने मात्र पाकिस्तान चांगलाच संकटात सापडला आहे. कारण बलुचिस्तान येथील बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) आपल्या हल्ल्यांत वाढ केली असून पाकिस्तानचे तब्बल 39 लष्करी तळांवर हल्ले केले असून त्याची जबाबदारी बीएलएने स्वीकारली आहे.

बीएलएने 39 तळांना केलं लक्ष्य

काही दिवसांपासून चालू असलेल्या भारत-पाकिस्तान तणावात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. आता युद्ध होणार नाही. मात्र भारताने अजूनही आपली सेना सज्ज ठेवलेली आहे. दुसरीकडे आता बलुचीस्तानमधील बलूच लिबरेशन आर्मीदेखील सक्रिय झाली आहे. बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळावे आणि हा एक वेगळा देश घोषित केला जावा यासाठी बीएलएकडून पाकिस्तानवर दबाव टाकला जात आहे. बीएलएने पाकिस्तानी सेना तसेच पोलिसांच्या 39 तळांना निशाणा बनवलं आहे.

गेल्या 48 तासांत हल्ल्यांत वाढ

बलुचिस्तानमधील बलुच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानवरील हल्ल्यांत वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 8 ते 10 मे या काळात म्हणजेच गेल्या 48 तासांत हे हल्ले वाढले आहेत. तहतक्वेटा, केच, पंजगूर, नुश्की, खुजदार तसेच या जिल्ह्यांसहीत अन्य काही जिल्ह्यांत 56 पेक्षा अधिक हल्ल्यांच्या घटनांची नोंद झाली आहे.

BLA ने सांगितलं आमची कारवाई सुरूच

BLA कडून स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला जात आहे. स्वातंत्र्यासाठी BLA कडून गेल्या बऱ्याच वर्षांपासून लढा दिला जात आहे. BLA ने पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांवरील 39 ठिकाणी केलेल्या हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे. एएनआयशी बोलताना BLA ने ही जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच आमची ही कारवाई चालूच राहील, अशी भूमिकाही BLA ने घेतली आहे.

दरम्यान, BLA ने पाकिस्तानवरील 39 हल्ल्यांची जबाबदारी घेतल्यानंतर आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पाकिस्तान BLA विरोधात काय कारवाई करणार? हेही पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.