India Pakistan ceasefire Live : शस्त्रसंधीसोबत कश्मीरवर देखील तोडगा काढणार : डोनाल्ड ट्रम्प
Sarkarnama May 11, 2025 09:45 PM
शस्त्रसंधीसोबत कश्मीरवर देखील तोडगा काढणार : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ट्रम्प यांनी चार दिवसांच्या संघर्षानंतर युद्धविरामासाठी सहमती दर्शवल्याबद्दल दोन्ही देशांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, या आक्रमकतेमुळे लाखो लोकांचे प्राण गेले असते. शांतता प्रस्थापित झाल्यानंतर आता ते दोन्ही देशांसोबत व्यापार आणि काश्मीर प्रश्नाच्या समाधानासाठी एकत्रितपणे काम करतील.

भारत पाकिस्तान तणावात सीएच्या परीक्षा लांबणीवर

भारत पाकिस्तान तणावामुळे ‘सीए’च्या परीक्षा लांबणीवर गेली आहे . ९ ते १४ मेदरम्यान होणाऱ्या इंटरमिजिएट, अंतिम व पोस्ट क्वॉलिफिकेशन कोर्सच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

संरक्षण मंत्रालयाची आज पत्रकार परिषद

संरक्षण मंत्रालयाकडून आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालय भारत पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीची सविस्तर माहिती या पत्रकार परिषदेतून देण्याची शक्यता आहे.

Indian Navy : मुंबईभोवती सुरक्षा वाढवली

Indian Navy : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भारतीय नौदलाने आता मुंबईतील समुद्रात ताफा तैनात केला आहे.

India Pakistan War Updates : नियंत्रण रेषेवर गोळीबार नाही - लष्करी अधिकारी

भारत-पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर सध्या गोळीबार सुरू नाही, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यानी दिली आहे. शिवाय श्रीनगरमध्ये कोणताही स्फोट झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद

जम्मू काश्मीर सीमारेषेवर तैनात बीएएसएफ जवान मोहम्मद इम्तियाज पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शहीद झाले. आज (11 मे) जम्मूतील फ्रंटियर मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

Ajit Doval : अजित डोवाल यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या घोषणेनंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना युद्ध हा भारताचा पर्याय नाही, असं डोवाल यांनी म्हटलं आहे. मात्र, दहशतवादाविरोधात कारवाई करण्याची गरज आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटल्याची माहिती समोर आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.