IPL 2025 DC vs LSG : दिल्लीकडून पराभूत होताच कर्णधार ऋषभ पंतने असं फोडलं खापर, स्पष्टच सांगितलं की…
GH News April 23, 2025 02:06 AM

आयपीएल 2025 स्पर्धेतील 40 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा वरचष्मा दिसला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि अक्षर पटेलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी अक्षर निर्णय योग्य ठरवला. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 6 गडी गमवून 159 धावा केल्या आणि विजयासाठी 160 धावा दिल्या. या धावा दिल्ली कॅपिटल्सने 17.5 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केल्या. अभिषेक पोरेल आणि केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीमुळे लखनौ सुपर जायंट्स पराभवाच्या दरीत ढकळली गेली. दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून दोन गुणांची कमाई केली आहे. या विजयासह गुणतालिकेत 12 गुण झाले असून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी फक्त दोन विजय दूर आहे. म्हणजेच सहा पैकी दोन सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफमधील स्थान पक्कं होणार आहे. पण दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सचं प्लेऑफचं गणित आणखी लांबलं आहे. लखनौला उर्वरित पाच पैकी 3 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. या सामन्यातील पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत संतापला आहे.

कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘आम्हाला माहित होते की आम्हाला 20 धावा कमी पडल्या आहेत. टॉसने मोठी भूमिका बजावली. जो कोणी प्रथम गोलंदाजी करत असेल, त्याला विकेटमधून खूप मदत मिळते. आम्हाला फक्त मागे राहावे लागले, आम्ही ते टाळू शकलो नाही. लखनौमध्ये नेहमीच असे घडते, विकेट चांगली होती आणि फलंदाज फलंदाजी करतात. खेळ असाच चालतो आणि तुम्ही तक्रार करू शकत नाही. हो, टॉस मोठी भूमिका बजावत आहे, पण आम्ही सबबी शोधत नाहीत. हा एक विचार आहे.’

ऋषभ पंत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचं कारण काय? तेव्हा तो म्हणाला की, ‘आम्ही समदला अशा विकेटचा फायदा घेण्यासाठी पाठवले. त्यानंतर मिलर आला आणि आम्ही विकेटमध्ये अडकलो. अखेर, या गोष्टी आहेत ज्या आम्हाला शोधून काढायच्या आहेत आणि पुढे जाऊन आमचे सर्वोत्तम संयोजन शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी सध्या काहीही विचार केलेला नाही, नुकताच सामना संपवला आहे, आपण पुन्हा संघटित होणार आहोत आणि पुन्हा लक्ष केंद्रित करणार आहोत. फक्त पुढचा सामना नव्याने खेळणार आहोत.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.