पहलगाममध्ये टीआरएफ संघटनेच्या दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. सरकारकडून आता पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या १६ जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आलीय. तर १० जण जखमी झाल्यांची नावेही दिली आहेत.
पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. तर उत्तर प्रदेश, गुजरात. हरियाणा, जम्मू काश्मीरमधील प्रत्येकी एकाचा मृत्यू झालाय. याशिवाय युएई आणि नेपाळ अशा दोन परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.
मृत्यू झालेल्यांची नावेमहाराष्ट्रातील दिलीप देसले, अतुल मोने यांचा हल्ल्यात मृत्यू झालाय. तर कर्नाटकातल्या मंजुनाथ शिवामु, शिवम मोगा हे मृत्यूमुखी पडले. उत्तर प्रदेशातील शुभम द्विवेदी, गुजरातमधील हिमत भाई, हरयाणातील विनय नरवाल, काश्मीरमधील सय्यद शाह, नेपाळच्या सुंदीप नेवपाने, युएईच्या उधवानी कुमार यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.