अक्षर पटेल याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात यजमान लखनौ सुपर जायंट्सवर एकतर्फी आणि धमाकेदार विजय साकारला आहे. लखनौ सुपर जायंट्सने दिल्लीचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. लखनौने दिल्लीला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने हे आव्हान 13 बॉलआधी 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. दिल्लीने 17.5 ओव्हरमध्ये 161 धावा केल्या. केएल राहुल आणि अभिषेक पोरेल या दोघांनी दिल्लीच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तर अक्षर पटेल आणि करुण नायर या दोघांनीची चांगली साथ दिली.
अभिषेक पोरल आणि करुण नायर या सलामी जोडीने दिल्लीला आश्वासक सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 36 धावा जोडल्या. दिल्लीला करुण नायर याच्या रुपात पहिला झटका लागला. करुणने 9 बॉलमध्ये 15 रन्स केल्या. करुणनंतर विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल मैदानात आला. अभिषेक आणि केएल या दोघांनी दिल्लीचा डाव पुढे नेला. या दोघांनी अप्रतिम बॅटिंग केली. अभिषेक पोरल याने या दरम्यान अर्धशतक झळकावलं. मात्र अभिषेक अर्धशतकानंतर आऊट झाला. केएल-अभिषेक या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 69 रन्स जोडल्या. अभिषेकने 36 चेंडूत 1 सिक्स आणि 5 फोरसह 51 रन्स केल्या.
अभिषेकनंतर कर्णधार अक्षर पटेल मैदानात आला. अक्षर आणि केएल या जोडीने दिल्लीला विजयापर्यंत नेलं आणि लखनौविरुद्ध एकतर्फी विजय मिळवून दिला. अक्षरने 20 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने नाबाद 34 धावा केल्या. तर केएलने दिल्लीसाठी सर्वाधिक धावा केल्या. केएलने 135.71 च्या स्ट्राईक रेटने 3 सिक्स आणि 3 फोरसह 42 बॉलमध्ये नॉट आऊट 57 रन्स केल्या. तर लखनौकडून एडन मारक्रम याने 2 विकेट्स घेतल्या.
दिल्लीचा दणदणीत विजय
दरम्यान त्याआधी अक्षर पटेल याने टॉस जिंकून लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र लखनौला चांगल्या सुरुवातीनंतरही 159 धावांपर्यंतच पोहचता आलं. लखनौसाठी एडन मारक्रन याने सर्वाधिक 52 धावा केल्या. मिचेल मार्श याने 45 रन्स केल्या. त्यानंतर मिड ऑर्डरमधील फंलदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. निकोलस पूरन याने 9 तर अब्दुल समद याने 2 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. इमपॅक्ट प्लेअर आयुष बदोनी याने 36 धावांचं योगदान दिलं. डेव्हिड मिलर याने नाबाद 14 धावा केल्या. तर कर्णधार ऋषभ पंत याला भोपळाही फोडता आला नाही. दिल्लीकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि दुष्मंथा चमीरा या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.